Home > Top News > शेअर्स मार्केट म्हणजे सट्टा की कमाईचे माध्यम?

शेअर्स मार्केट म्हणजे सट्टा की कमाईचे माध्यम?

शेअर्स मार्केट म्हणजे सट्टा की कमाईचे माध्यम?
X

आपल्या ऐकण्यात किंवा वाचण्यात एकतर शेअर मार्केट मध्ये एखाद्या व्यक्तीला खूप फायदा झाला म्हणजे एखादा ₹10 चां शेअर 3 वर्षात ₹ 3000 झाला.

किंवा आपल्या एकण्यात किंवा वाचण्यात एखाद्या व्यक्तीला खुप नुकसान झाले व तो कर्जबाजारी झाला. म्हणजे त्याने गुंतवलेला ₹5000 चां शेअर 3 वर्षात ₹5 झाला व त्या शेअर मध्ये भरपूर गुंतवणूकदाराचे खूप मोठे नुकसान झाले.

वरील दोन्ही उदाहरणेच फक्त प्रकाशझोतात येतात व येथूनच समज आणी गैरसमज निर्माण होतात. शक्यतो मनुष्य धर्म स्वभावाप्रमाणे आपण फक्त नेगेटिव्ह बाजूच लक्षात ठेवतो व शेअर मार्केट म्हणजे एक जुगार असा आपला समज होऊन बसतो. यात चूक आपलीच असते व आपले अज्ञान आपण आपल्या पुढील पिढीच्या माथ्यावर मारतो.

शेअर मार्केट हे उपजीविकेचे साधन होऊ शकते का?

या प्रश्नाचे उत्तर दयायचे म्हणाल तर होय असेच आले पाहिजे,पण त्यासाठी आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याचे तंत्र आत्मसात करायला हवेच.

शेअर मार्केट मध्ये कमाई करण्याचे किती मार्ग आहेत.

1- शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून

2- इन्ट्राडे ट्रेडिंग

3- शेअर मार्केट मध्ये subbroker म्हणून काम करून

4- शेअर मार्केट मध्ये NISM च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन Techinal adviser म्हणून काम करून

अशा वरील 4 प्रकारे आपण काम करून शेअर मार्केट एक कमाईचे किंवा उपजीविकेचे साधन करू शकतो. पण त्यासाठी अगोदर आपल्याला शिकावे लागेल ज्ञान घ्यावे लागेल.

फर्स्ट learn then earn. तुमच्याकडे ज्ञान असेल तर पैसा तुमच्या मागे आपोआप येईल.

श्रीपाद कुलकर्णी

लेखक हे शेअर बाजाराचे अभ्यासक असून वरील माहिती ही फक्त आर्थिक साक्षरतेसाठी देण्यात आली आहे

संपर्क मो. 9076145924

Updated : 23 Aug 2025 8:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top