Home > Top News > ह्या माणसाला फक्त नीच म्हणता येईल - आव्हाड

ह्या माणसाला फक्त नीच म्हणता येईल - आव्हाड

फडणवीसांच्या माजी प्रसिध्दीप्रमुखाच्या शरद पवारांवरील ट्विटमुळं वाद

ह्या माणसाला फक्त नीच म्हणता येईल - आव्हाड
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्यावर एक शस्त्रक्रिया ही करण्यात येणार आहे. दरम्यान, शरद पवार यांचा आजार राजकीय स्वरूपाचा आहे की काय अशा स्वरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. अमित शहा यांच्याशी अहमदाबाद इथे गुप्त भेट झाली अशा स्वरूपाच्या बातम्या आल्यानंतर आघाडी सरकारमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारला कोंडीत पकडलेलं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ पेरलेली स्फोटकं, त्यानंतर मनसुख हिरेन चा खून, मिठी नदीत सापडलेले पुरावे, माजी पोलीस आयुक्तांनी केलेले १०० कोटी हप्ता वसूलीचे आरोप या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेना बॅकफूटवर आलीय. राज्यातील सरकार पाडण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत असताना पवार-शहा भेटीच्या गुजराती वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या. शरद पवार हे प. बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचाराला जाणार होते, मात्र बदललेल्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला दुखावून पवार प. बंगाल ला जातील का अशी शंका उपस्थित केली जात होती. अशातच पवारांच्या आजारपणाची बातमी आली आणि ते शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात भर्ती होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्यानंतर माजी पत्रकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाचे सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या रविकिरण देशमुख यांनी एक ट्वीट केलं होतं.



या ट्वीट मध्ये शरद पवारांच्या आजारपणावरून भाष्य करण्यात आले होते. पवारांना सध्या कुणालाच दुखवायचं नाहीय, असं ही भाष्य त्यात करण्यात आलं होतं. या ट्वीट वर कडवट प्रतिक्रीया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'ह्या माणसाला फक्त नीच म्हणता येईल असं ट्वीट केलं आहे.



राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी दिलेल्या या कडवट प्रतिक्रीयेनंतर रविकिरण देशमुख यांना सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.

Updated : 6 Sep 2022 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top