Home > Top News > जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास शेअर मार्केट शिका!

जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास शेअर मार्केट शिका!

शेअर मार्केटमध्ये उज्ज्वल भविष्य आहे

जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास शेअर मार्केट शिका!
X

जीवनात सर्वांनाच पैसे कमवायचे आहेत किंवा यशस्वी व्हायचे आहे. शेअर बाजारातही यशस्वी होऊन खूप पैसे कमावता येतात. मात्र, शेअर बाजाराचा अभ्यास करताना कुणीही शेअर बाजारातील व्यक्ती यशस्वी ट्रेडर किंवा गुंतवणूकदार कसा झाला याचा विचार करत नाहीत.

सर्वांना राकेश झुणझुणवाला ,हर्षद मेहता माहित आहेत.परंतु या लोकांनी यशस्वी होण्यासाठी किती कष्ट केले असतील किंवा त्यासाठी किती प्रयत्न केले असतील हे कुणीच पाहत नाही . सर्वांना 'रिस्क है तो लाला इस्क है ' एवढंच माहिती आहे.

सेबीच्या सर्वेक्षणानुसार शेअर बाजारात फक्त ५ टक्के ट्रेडर यशस्वी होतात. बाकी सर्व ट्रेडर्सना नुकसान होते. या सर्व ट्रेडर्सना एका दिवसात हर्षद मेहता व्हायचे आहे.

शेअर मार्केट समुद्र आहे. या समुद्रात चांगला पोहणाराच तग धरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून आरबीआय व्याज दरात कपात करत आहे. त्यामुळे बँकेतील मुदत ठेवी म्हणजेच एफडीचे व्याज दर दिवसेंदिवस कमी होत आहे. मग अशावेळी

तुम्ही कुठे गुंतवणूक कराल? कोणता पर्याय आहे तुमच्यासमोर ?

तुमच्या पैशाचे नियोजन तुम्ही कसे कराल? तुमची गुंतवणूक महागाईवर मात करू शकेल काय ?

पैशाचे योग्य नियोजन तुम्हाला एक यशस्वी व्यक्ती आणि यशस्वी ट्रेडर बनवेल.

पैसा हे औषध आहे, पैशामुळे ९९ टक्के जीवनातील आजार कमी होतात,असं बोललं जाते. पैशाचे औषध तुम्हाला कसे मिळेल याकडे लक्ष द्या.

तुमच्या आजबाजूला पाहा,अनेक व्यावसायिक लाखो रुपये गुंतवणूक व्यवसाय करत आहेत.

शेअर मार्केट असा व्यवसाय आहे. या व्यवसायात लाखो रुपये नसले तरी चालतील तुमच्याकडे ज्ञान हवे.

शेअर बाजारात कोट्यवधी लोकं लाखो रुपयांची गुंतवणूक करून कोट्यवधी रुपये कमावत आहेत. तुम्ही हजार रुपये लावून लाख रुपये सहज कमावू शकता.

Updated : 24 Aug 2025 11:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top