गुंतवणूकीसाठी चांगल्या शेअर्सची निवड कशी करावी
X
शेअर बाजारातून चांगला नफा मिळवण्यासाठी योग्य कंपनीची निवड करणे हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठं आव्हान असतं. कंपनीचा व्यवसाय, बाजारातील स्पर्धा, व्यवस्थापन या सगळ्याचा सखोल अभ्यास करणे सर्वांनाच शक्य होत नाही. मात्र, अशा वेळी एक सोपी व प्रभावी पद्धत आहे – ROI म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट.
ROI म्हणजे काय?
गुंतवणुकीवर मिळणारा परतावा म्हणजे ROI. हे टक्केवारीत मोजले जाते आणि गुंतवणूक फायदेशीर आहे की नाही हे दाखवते.
ROI काढण्याच्या पद्धती
पहिली पद्धत : नफ्याला एकूण गुंतवणुकीने भागाकार करून १०० ने गुणिले केल्यास ROI मिळतो.
दुसरी पद्धत : गुंतवणुकीनंतर मिळालेली रक्कमेतून मूळ गुंतवणूक वजा करून, ती रक्कम गुंतवणुकीच्या खर्चाने भागाकार करावी व १०० ने गुणिले करावे.
समजून घ्या निकाल
ROI पॉझिटिव्ह असल्यास गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
ROI निगेटिव्ह असल्यास गुंतवणुकीत तोटा होतो.