Home > Top News > Social Media फ्रेंडली खर्चिक लग्न समारंभाचा प्रपंच कशासाठी ?

Social Media फ्रेंडली खर्चिक लग्न समारंभाचा प्रपंच कशासाठी ?

Social Media फ्रेंडली खर्चिक लग्न समारंभाचा प्रपंच कशासाठी ?
X

“सत्ता आणि पैशाचा माज करायचा नाही” असं सांगणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला… साखरपुडा समारंभात करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चामुळे समाज माध्यमांवर इंदुरीकर यांच्यावर टीका होऊ लागल्या. अर्थातच त्यांच्या किर्तनाद्वारे ते सांगतात एक आणि करतात एक असं चित्र दिसू लागलं. असो इंदुरीकर यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभानिमित्ताने लग्नातील खर्च, समाजाचा दबाव, Social media perfection, श्रीमंताचा थाट आणि चित्रपटसृष्टीतील भव्यदिव्य असे सेट,सीन गरिबांना, सर्वसामान्यांना, तरूणपिढीला कर्जविळख्यात नेऊ पाहताहेत का ? लग्न फक्त इव्हेंटचा भाग झाला आहे का? या विषयी मॅक्स वुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांचे सविस्तर विश्लेषण…

https://youtu.be/9fkKWbCUmyI?si=MAt7eRM8xACEV5lK

Updated : 9 Nov 2025 7:10 AM IST
Next Story
Share it
Top