Home > Top News > बागेश्वरधामच्या (Bageshwar Dham)भक्तीसाठी एकवटले , चोरट्यांनी लुट लुट लुटले...

बागेश्वरधामच्या (Bageshwar Dham)भक्तीसाठी एकवटले , चोरट्यांनी लुट लुट लुटले...

धीरेंद्र शास्त्री भक्तगणाच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

बागेश्वरधामच्या (Bageshwar Dham)भक्तीसाठी एकवटले , चोरट्यांनी लुट लुट लुटले...
X

धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri)त्याच्या वादग्रस्त लीलांनी देशभर चर्चेत आहे. पण त्याचा मीरा भाईंदर येथे झालेला कार्यक्रम मात्र चोरीच्या घटनांनी चर्चेत आला आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या मीरा रोड येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात हातसफाई केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. एस.के. स्टोन मैदानात सुरु असलेल्या कार्यक्रमात भक्तांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लुटले गेलेल्या जवळपास पंचवीसहून अधिक जणांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
धीरेंद्र शास्त्रीच्या (Live Programme of Bageshwar Dham)कार्यक्रमाच्या पहिल्याच दीवशी सुमारे एक लाख लोक जमा झाले होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र, सोनसाखळी तसेच इतर सोन्याचे दागिने चोरले आहेत. चोरी झाल्यानंतर या नागरिकांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. आज देखील या कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता असून भक्तांनी आपल्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करण्याचे आव्हान करण्यात येत आहे…


Updated : 2023-03-19T14:55:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top