Home > Top News > डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, २२ आरोपी ताब्यात

डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, २२ आरोपी ताब्यात

डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, २२ आरोपी ताब्यात
X

अवघ्या महाराष्ट्रा ची मान शरमेने खाली जाईल अशी घटना डोंबिवली(Dombivli) मध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० जणांनी सामूहिक बलात्कार(rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील पिडीतेचे वय अवघे १४ वर्षे आहे. ३० पैकी २२ आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.



डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जानेवारी २०२१ मध्ये पिडीतेच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्या नराधमाने त्याचा व्हिडीओ शुट केला होता. त्यानंतर त्या नराधमाने हा व्हिडीओ काही जणांना दाखवला. या व्हिडीओच्या आधारे पिडीत मुलीला ब्लॅकमेल करत ३० जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सातत्याने सुरू होता. अखेर या प्रकाराला कंटाळून पिडीत मुलीने सदर बाब आपल्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


पिडीतेच्या कुटूंबाने पोलिसात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना ताब्यात घेतले असुन ८ जणांचा शोध अद्यापही सुरू आहे.

Updated : 23 Sep 2021 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top