Home > Top News > माजी मुख्यमंत्र्याला कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

माजी मुख्यमंत्र्याला कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

माजी मुख्यमंत्र्याला कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु
X

आज राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोव्हीड ची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूर च्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची कोव्हिड ची टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तातडीन पुण्यात हलवण्यात आलं आहे.

राज्यात १९८५ मध्ये नऊ महिने शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. २००२ मध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते महसूलमंत्री होते.

Updated : 16 July 2020 5:46 PM GMT
Next Story
Share it
Top