Home > Top News > Fact Check : १४ वर्षांपूर्वी मेलेल्या दहशतवाद्यांच्या फोटो पाकिस्तानी युजर्सनी भारतीय सैनिक म्हणून शेअर केले

Fact Check : १४ वर्षांपूर्वी मेलेल्या दहशतवाद्यांच्या फोटो पाकिस्तानी युजर्सनी भारतीय सैनिक म्हणून शेअर केले

Fact Check : १४ वर्षांपूर्वी मेलेल्या दहशतवाद्यांच्या फोटो पाकिस्तानी युजर्सनी भारतीय सैनिक म्हणून शेअर केले
X

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्यानं ६-७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळं उध्वस्त केले. काही रिपोर्टनुसार ७ मे रोजी पाकिस्तानच्या सैन्यानं जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण (LoC) रेषेजवळील गावांना लक्ष्य करत गोळीबार केला. यामध्ये चार मुलं आणि एका जवानासह १३ जणांचा मृत्यू तर ५७ लोकं जखमी झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या काही नेटिझन्सनी १२ भारतीय सैनिकांना मारल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केलीय. या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये काही शवपेट्या असल्याचं दिसतंय.

पाकिस्तानी प्रॉपगेंडा X-हैंडल@PakistaniFauj ने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, “पाकिस्तानी सैन्यानं नं बट्टल सेक्टर मधील धर्मशाला १ आणि २ या चौक्यांना लक्ष्य केलं. यात कमीतकमी १२ भारतीय सैनिकांचा मृत्यू झालाय. या दोन्ही चौक्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत”

व्हेरिफाइड X-हैंडल @KashmirUrdu या अकाऊंटवरुनही याच दाव्यासह व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

व्हेरिफाइड X-हैंडल @A_MQQ_ या ट्विटर अकाऊंटवर सुद्धा हाच दावा करत व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.


फॅक्ट चेक

ऑल्ट न्यूज ने या कथित व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीसाठी काही की-फ्रेम्स ला रिवर्स इमेजमध्ये टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओप्रमाणेच एक फोटो आढळला. तो २० ऑगस्ट २०११ ला gettyimage च्या वेबसाईटवर अपलोड झाला होता. या फोटोसोबत दिलेल्या माहितीनुसार, फारुख खान पूल याने हा फोटो काढला होता. त्यात लिहिण्यात आलं होतं की, २० ऑगस्ट २०११ रोजी नियंत्रण रेषेजवळ उत्तर काश्मीर च्या गुरेज सेक्टर मध्ये घुसखोरी करतांना कमीत कमी १२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.

या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मूळ फोटोमध्ये भारतीय सैन्याचे जवान आणि हेलिकॉप्टर दिसत आहे, हे दोन्ही घटक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून हटविण्यात आले आहेत.

भारतीय सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल जेएस बरार यांनी अलजजीरा या वृत्तवाहिनीला सांगितलं होतं की, “२० ऑगस्ट २०११ रोजी १२ दहशतवादी एका बोटीतून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. आणि किशनगंगा नदी च्या काही क्षेत्रात प्रत्यक्ष सीमारेषा आहे. गोळीबारा दरम्यान ६ दहशतवादी याच नदीत पडले तर इतर नदीकाठावर मारले गेले”. या रिपोर्टमध्ये वापरण्यात आलेल्या फोटोमध्ये उभ्या असलेल्या भारतीय जवानाच्या मागे जमिनीवर पार्थिव ठेवण्यात आलेले आहेत, जे अगदी हुबेहुब व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

https://www.altnews.in/hindi/act-check-old-video-falsely-claims-pakistan-army-strikes-killed-12-army-persons/

Updated : 10 May 2025 7:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top