Home > Top News > Fact Check : भारतीय वायूसेनेच्या स्क्वॉड्रन लीडल शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात, खोटी बातमी

Fact Check : भारतीय वायूसेनेच्या स्क्वॉड्रन लीडल शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात, खोटी बातमी

Fact Check : भारतीय वायूसेनेच्या स्क्वॉड्रन लीडल शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात, खोटी बातमी
X

Fact Check : भारतीय वायूसेनेच्या स्क्वॉड्रन लीडल शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात, खोटी बातमी

सध्या भारत-पाकिस्तानच्या सीमेवर मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. यापार्श्वभूमीवर भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळांवर भारतीय वायूसेनेकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील काही नेटिझन्सनी भारतीय वायूसेनेतल्या स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याच्या पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केलीय.

@M1Pak या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह यांना पाकिस्तानात पकडण्यात आल्याचं म्हटलंय. १८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही लोकं एका दिशेनं पळत असल्याचं दिसतंय. त्यात कुणालाही पकडण्यात आल्याचं दिसत नाहीये. हा व्हिडिओ मोबाईलमधून थोड्या अंतरावरुन घेतलेला आहे. @ExactPressIntl या ट्विटर हँडलवरची पोस्ट @M1Pak या हँडलनं शेअर केली आहे. @ExactPressIntl या हँडलनं १० मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांनी खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केलाय.


अशाच पद्धतीनं @ExactPressIntl या ट्विटर हँडलवरुनही भारतीय महिला स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह यांना पाकिस्तानात पकडण्यात आल्याचा दावा करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया हँडल्सकडून संभ्रम निर्माण करणाऱ्यासाठी हा फेक व्हिडिओ व्हायरल केला जातोय. अशा पद्धतीच्या व्हिडिओ किंवा माहितीवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया नं केलंय.

फॅक्ट चेक

स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याचा पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सचा दावा खोटा असल्याचं पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडियानं ट्विटरद्वारे स्पष्ट केलंय. मॅक्स महाराष्ट्रन यासंदर्भात रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर defencepk.com या वेबसाईटवर पाकिस्तानी नागरिकांच्या चर्चेसाठीच्या वेबसाईटवर पोहोचलो. मात्र, इथंही या दाव्याविषयी काहीही आढळलं नाही. Brother on road, FBISE EDUCATION EXPRESS, Creative Shorts, DefenseData, Raja Dilawar PMLN अशा फक्त ८ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर खोट्या दाव्यासह व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. भारतीय सैन्याच्या वतीनं किंवा कुठल्याही अधिकृत न्यूज चॅनेल किंवा माध्यमांवर स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह यांना पाकिस्तानमध्ये पकडण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळं पाकिस्तानच्या काही सोशल मीडिया हँडल्सवरुन स्क्वॉड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडण्यात आल्याचा दावा हा खोटा असल्याचं सिद्ध झालंय.

Updated : 10 May 2025 7:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top