Fact Check : काँग्रेसचं तुर्की इथं ऑफिस ? रिपब्लिक चॅनेल तोंडावर आपटलं, गुन्हा दाखल
X
१५ मे २०२५ रोजी रिपब्लिक या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील प्राइम-टाइम शो मध्ये संपादक अर्णब गोस्वामी ने दावा केला होता की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चं तुर्की इथं अधिकृत कार्यालय आहे. यावेळी अर्णब याने इस्तंबूल काँग्रेस सेंटरचा एक फोटो दाखवला आणि हेच काँग्रेस पक्षाचं अधिकृत कार्यालय असल्याचा दावा केला. याच शो मध्ये अर्णब म्हणाला, गांधी कुटुंबानं सातत्यानं राष्ट्रीय हितासोबत तडजोडी केल्या आहेत.
अलिकडच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत काँग्रेस पक्ष आणि तुर्की यांच्या कथित संबंधांवर चिंता व्यक्त करत अर्णब गोस्वामी ने हा मुद्दा राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला. अर्णब याने प्रेक्षकांना काँग्रेस पक्षावर बहिष्कार टाकून प्रतिबंध करण्याची मागणी करत शत्रूचा मित्र हा देखील शत्रूचं असल्याचं म्हटलं होतं.
भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये तुर्की ने पाकिस्तानची बाजू घेतली होती. त्यानंतर भारतानं तुर्कस्तानसोबतचे संबंध तोडण्याची मागणीनं जोर धरला होता. जम्मू-काश्मिरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ नागरिकांचा जीव गेला होता. या घटनेनंतर भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळं उध्वस्त केली. त्यानंतर तुर्कस्ताननं या कारवाईचा उल्लेख ‘भडकाऊ’ असा केला...भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार पाकिस्ताननं भारतीय सैन्याच्या छावण्या आणि नागरी वसाहतींना लक्ष्य करण्यासाठी चीन आणि तुर्कस्तान या देशांनी दिलेल्या शस्त्रांचा वापर केला होता... भारत-पाकिस्तान यांच्यातला संघर्ष वाढल्यानंतर तुर्कस्तान कुणाच्या बाजून आहे, हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळं भारतीयांनी सामूहिकपणे तुर्कस्तानशी संबंधित सर्व हवाई वाहतूक बंद केली. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, आयआयटी बॉम्बे आणि जामिया-मिलिया इस्लामिया सारख्या संस्थांनी देखील तुर्कस्तानच्या विद्यापीठांशी असलेले सर्व करार रद्द केले.
काँग्रेस आणि त्यांच्या ‘तुर्कस्तान कार्यालय’ संदर्भात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय ने देखील १७ मे रोजी रिपब्लिक टीव्हीच्या शो मधील ‘तुर्कस्तान’ च्या त्या सेगमेंटचा व्हिडिओ शेअर केला. ‘काँग्रेस’ ला हे पाऊल का उचलावं लागलं, असा प्रश्न मालवीय यांच्या पोस्टमधून राहुल गांधींना विचारण्यात आला.
Did you know that the Congress Party has a registered office in Turkey? Can Rahul Gandhi explain what necessitated this move? This is bizarre and inexplicable on multiple levels. India deserves to know.
— Amit Malviya (@amitmalviya) May 17, 2025
Remember: the enemy’s friend is an enemy too. pic.twitter.com/lOnPrS5SpY
सोशल मीडियावरील ऋषी बागरी (@rishibagree) देखील हाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेसला तुर्कस्तानमध्ये कार्यालय सुरु करण्याची गरज का पडली ? जेव्हा की तिथं फक्त ३०० भारतीय राहतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अर्दौगन काँग्रेसचे नवे नेते आहेत का ? की जे इस्लामीकरणाची योजना आखत आहेत ? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले.
Even though the Indian population in Turkey is only around 300, the Congress party has an office there. What is the reason for this?
— Rishi Bagree (@rishibagree) May 18, 2025
Is Erdogan the new Caliph of Congress, orchestrating its blatant Islamization?pic.twitter.com/jYRR1pltyv
जयपूर डायलॉग्स या आणखी एका ट्विटर अकाऊंटवरुनही हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि काँग्रेसचं कार्यालय तुर्कस्तानमध्ये कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. विशेष म्हणजे @JaipurDialogues या ट्विटर हँडलला चूकीची माहिती देतांना ऑल्ट न्यूजनं अनेकदा उघडं पाडलंय...
Why does Congress has a registered office in Turkey?pic.twitter.com/k3fpyWU6Ed
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) May 18, 2025
फॅक्ट चेक
रिपब्लिक च्या या सेगमेंटमध्ये दाखविण्यात आलेल्या इमारतीला तुर्कस्तानला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अधिकृत कार्यालय असल्याचं सांगण्यात आलंय...प्रत्यक्षात ही इमारत इस्तंबूल काँग्रेस सेंटरची आहे. ही इमारत एक संमेलन केंद्र आहे. या केंद्राची ही इमारत तुर्कस्तानच्या सिसली जिल्ह्यातल्या हरबिये जवळ आहे. या इमारतीचं उद्घाटन १७ ऑक्टोबर २००९ मध्ये झालं होतं. या इमारतीची मालकी ही इस्तंबूल महापालिकेची आहे.
या इमारतीचं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही.
नोव्हेंबर २०१९ मध्ये काँग्रेसनं इस्तंबूल इथं एक परदेशी कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुहम्मद यूसुफ खान यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (IOC) च्या तुर्कस्तानचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालील इंडियन ओव्हरसीज काँग्रेस, काँग्रेस समर्थक आणि पदाधिकारी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात.
मात्र, २०१९ मध्ये अशाप्रकारची घोषणा झाल्यानंतर त्याच पुढं काय झालं ? खरंच तिथं काँग्रेसचं कार्यालय स्थापन झालं का ? याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. कारण इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या वेबसाईटवर जिथं इतर देशात त्यांचं कार्यालय आहे त्यात तुर्कस्तानचा उल्लेखच नाहीये.
२० मे रोजी रिपब्लिक न्यूज चॅनेलनं एक खुलासा केला. यात त्यांनी तुर्कस्तानमध्ये काँग्रेसचं कार्यालय असल्याचं दाखविण्यासाठी चुकीचा फोटो वापरल्याचं मान्य केलं. मात्र, यात त्यांनी तिथं काँग्रेसचं कार्यालय नाहीये, असं अजिबात म्हटलं नाही. फक्त बातमीमध्ये वापरलेला फोटो चुकीचा असल्याचं म्हटलं होतं.
Republic Corrigendum pic.twitter.com/dIkaH4Z6JE
— Republic (@republic) May 20, 2025
ऑल्ट न्यूज ने सैम पित्रोदा यांच्याशी संपर्क केला. ओव्हरसीज काँग्रेसचं कुठलंही कार्यालय तुर्कस्तानमध्ये नसल्याचं पित्रोदा यांनी स्पष्ट केलं.
२२ मे रोजी रोजी पित्रोदा यांनी तुर्कस्तानमध्ये काँग्रेसचं कार्यालय असल्याचा दावा फेटाळत IOC चं म्हणणं सोशल मीडियामध्ये पोस्ट केलं.
“आमच्या लक्षात आलंय की, मुख्य प्रवाहातील काही माध्यमांकडून द्वेषापोटी आधारहीन अफवा पसरविल्या जात आहे. यामध्ये खोटा आरोप केला जातोय की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं इस्तंबूल इथं अधिकृत कार्यालय आहे. या कपोलकल्पित दाव्यांचा आम्ही कठोर शब्दात निषेध करत हे आरोप फेटाळत आहोत. हे सर्व जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठीचे खटाटोप आहेत”.
राजकीय धुळवड
रिपब्लिक चॅनेलनं चुकीचा फोटो वापरल्यानंतर राजकीय वादावादी झाली. २० मे रोजी युवक काँग्रेसनं भाजप नेता अमित मालवीय आणि रिपब्लिक चॅनेलचा संपादक अर्णब गोस्वामी विरोधात चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
🚨 Time's up for Amit Malviya and Arnab Goswami 🚨
— Indian Youth Congress (@IYC) May 20, 2025
An FIR has been filed in Karnataka under non-bailable sections against @amitmalviya and @republic Editor-in-Chief Arnab Goswami for defaming the constitutional office of Leader of Opposition Shri @RahulGandhi.
Their relentless… pic.twitter.com/mVpja8JR6v
काही वेळासाठी रिपब्लिक चॅनेलनं केलेली चूक बाजूला ठेवूया. मात्र, काँग्रेसच्या परदेशातील अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारी अमित मालवीय यांची पोस्ट बुचकाळ्यात टाकणारी आहे. कारण असं करणारा काँग्रेस एकमेव पक्ष नाहीये. भाजपसहित अन्य राजकीय पक्षांच्या समित्या आणि समर्थक परदेशात आहेत.
ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी (OFBJP) ची इंग्लड, अमेरिका, नेदरलँड आणि अन्य देशांमध्ये कार्यालयं आहेत. उलट काही बातम्या आणि लेखांमधून स्पष्ट संकेत मिळतात की OFBJP चं तुर्कस्तानमध्येही अस्तित्व आहे. या सर्व माहितीमधून तुर्कस्तानमध्ये OFBJP चे दिपांकर गांगुली हे संयोजक असल्याचंही समोर आलंय...
ऑगस्ट २०१८ मध्ये भाजपाचे तत्कालीन वरिष्ठ नेते आणि OFBJP चे वैश्विक संयोजक विजय जॉली यांनी अंकारा इथं तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोआन यांची भेट घेतली होती, यावेळी जॉली यांनी एर्दोआन यांना कमळ चिन्हं असलेला भाजपचा गमजा भेट म्हणून दिला होता.
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामध्ये OFBJP च्या तुर्कस्तानमधील उपस्थितीवरही प्रकाश टाकण्यात आला होता.
एकूणच काय तर इस्तंबूलमधील ज्या इमारतीला लोकं काँग्रेसचं कार्यालय म्हणत आहेत, प्रत्यक्षात ती इमारत इस्तंबूल कन्वेंशन सेंटरची आहे. या इमारतीची मालकी ही तिथल्या महापालिकेची आहे. या इमारतीशी काँग्रेसचा काडीचाही संबंध नाही. २०१९ मध्ये काँग्रेसनं तुर्कस्तान इथं एक कार्यालय निर्माण करण्याची घोषणा मात्र केली होती. परंतू, त्यांच्या वेबसाईटवर कुठलीही अशी बातमी नाहीये की, ज्यात काँग्रेसनं तुर्कस्तानमध्ये कार्यालय स्थापन केलंय, याची अधिकृत माहिती देईल. ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी ऑल्ट न्यूजला सांगितलं की, काँग्रेसचं तिथं कुठलंही कार्यालय नाहीये. याशिवाय राजकीय पक्षांना समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय संघटन असणं यात काहीही असामान्य नाहीये, तुर्कस्तानमध्ये भाजपचं अस्तित्व असल्याचंही पित्रोदा यांनी सांगितलं.
(https://www.altnews.in/hindi/republic-uses-unrelated-image-of-istanbul-congress-center-as-congress-partys-turkey-office-stirs-political-storm/)