Home > Top News > Dhule | धुळ्यामध्ये विजयी मिरवणुकीवर दगडफेक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Dhule | धुळ्यामध्ये विजयी मिरवणुकीवर दगडफेक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Dhule | धुळ्यामध्ये विजयी मिरवणुकीवर दगडफेक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
X

धुळे: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, सकाळी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, धुळे जिल्ह्यात मतमोजणीदरम्यान विजयी मिरवणुकीत तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली, त्यामुळे या प्रक्रियेला गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

शिरपूर शहरातील वाल्मीक नगर परिसरात विजयी मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अटीतटीच्या लढतीनंतर आजच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. गावपातळीवरील सत्तेची समीकरणं कोण जुळवणार आणि मतदारांनी कोणाच्या पारड्यात कौल दिला आहे, याचा निर्णय काही तासांत स्पष्ट होणार आहे. आजचा रविवार अनेक राजकीय दिग्गजांसाठी प्रतिष्ठेचा मानला जात आहे.

दरम्यान, धुळ्यातील घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यभरातील मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

Updated : 21 Dec 2025 4:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top