Home > Top News > काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फटका सर्व विरोधकांना – सामना

काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फटका सर्व विरोधकांना – सामना

काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फटका सर्व विरोधकांना – सामना
X

राजस्थानातील सत्ता नाट्यानंतर उघड झालेल्या ऑडिओ टेपमधून इथे राजकीय डावपेचांसाठी मनी पॉवरचा वापर सुरू होता हे आता उघड झाले आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्रात शिवसेनेसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसलाही टोले लगावण्यात आले आहेत. राहुल गांधी यांना चांगले काम करु द्यायचे नाही यासाठी काँग्रेसमधलेच काही जण प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप सामनामधून करण्यात आला आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसमधील या अंतर्गत कलहाचा फटका सर्व विरोधकांना बसत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

पाहूया या अग्रलेखात काय म्हटले आहे.

फोन टॅपिंग व बरेच काही! गुन्हेगार कोण?

राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले, पण काँगेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसतो. फोन टॅपिंग हा गुन्हा व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे.

राजस्थानमधील राजकीय युद्धाचे कवित्व अद्यापि संपलेले नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सचिन पायलट यांची जी सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजे राजस्थानचे गेहलोत सरकार हे पैसे चारून पाडायचे, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचे हे ठरले होते. सचिन पायलटांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आणि त्यासाठी पायलट व भाजप नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले. ते धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे.

हे ही वाचा..

Saamana Editorial : काही घरे विरोधकांसाठी सोडा, सामनामधून भाजपला टोला

Saamana Editorial : काँग्रेसच्या बचावासाठी शिवसेनेचा ‘सामना’

काँगेस पक्षावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर फुले उधळण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह किंवा जुने-नवे वाद आहेत व ते संपणारे नाहीत. राहुल गांधी यांना यश मिळवू द्यायचे नाही यासाठीच जणू हे वाद काही ठरावीक मंडळींकडून ठरवून काढले जातात. मध्य प्रदेश त्यातूनच गेले. राजस्थान तूर्त बचावले.

Updated : 20 July 2020 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top