Strawberry : स्ट्रॉबेरीचे एकंदरीत उत्पन्न आणि लागवडीची पूर्ण प्रक्रिया
Strawberry हा पिक कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे सर्वाधिक प्रमाणात घेतला जातो. तिथल्या वाण महाबळेश्वरमध्ये आणून त्याची व्यापारी लागवड सुरू झाली.
X
1. स्टोबेरी लागवडीची प्रक्रिया
स्ट्रॉबेरी थंड हवामानात उत्तम होते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात लागवड केली जाते. रोपे साधारण ३० x ४५ से.मी. अंतरावर लावली जातात. ठिबक पद्धतीने पाणीपुरवठा आणि पॉलिथिन मल्च वापरल्यास उत्पादन चांगले मिळते. नियमित गळ्यात खतं (सेंद्रिय व रासायनिक) आणि रोगनियंत्रण महत्त्वाचे असते.
2. स्ट्रॉबेरीचे सरासरी उत्पन्न
साधारणपणे स्ट्रॉबेरीचे एकरी ८ ते १२ टन उत्पन्न मिळते. हवामान, जमिनीची सुपीकता, व्यवस्थापन पद्धती यावर हे अवलंबून असते. योग्य तंत्रज्ञान वापरल्यास उत्पादन आणखी वाढू शकते.
3. कॅलिफोर्निया ते महाबळेश्वर प्रवास
स्ट्रॉबेरी हा पिक कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे सर्वाधिक प्रमाणात घेतला जातो. तिथल्या वाण महाबळेश्वरमध्ये आणून त्याची व्यापारी लागवड सुरू झाली. हळूहळू महाबळेश्वर व पंचगणी हे भारतातील स्ट्रॉबेरीचे केंद्र बनले. आज "महाबळेश्वर स्ट्रॉबेरी" ला GI Tag देखील मिळाले आहे.
4. एका एकरमधील स्ट्रॉबेरीचे सरासरी उत्पन्न
साधारण एका एकरमध्ये ८ ते १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. (१०-१२ टन उत्पादन व बाजारभाव ₹८० ते ₹१५० किलो धरून). बाजारभाव, पॅकिंग, वाहतूक खर्च व हवामान या गोष्टींवर नफ्यात चढ-उतार होतो.
शेतकरी - पांडुरंग भिलारे
गाव - हरोशी, महाबळेश्वर