Home > Top News > सोशल मीडियात Cian Agro ची चर्चा

सोशल मीडियात Cian Agro ची चर्चा

काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून कंपनीच्या नफा वाढीवर प्रश्नचिन्ह

सोशल मीडियात Cian Agro ची चर्चा
X

नागपूर येथील Cian Agro Industries & Infrastructure Ltd. या कंपनीबाबत सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल गडकरी यांची ही कंपनी आहे. अलीकडील काळात या कंपनीच्या नफ्याबाबत आणि राजकीय संबंधांबाबत विविध दावे व आरोप करण्यात येत आहेत.

काँग्रेस नेत्यांनी कंपनीच्या व्यवसायातील वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सोशल मीडियावरून तीव्र टीका करत पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कंपनीच्या नफ्यात झालेल्या वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी लिहिलं आहे की, “सामान्य गुंतवणूकदारांना फसवणूक करून काही कंपन्या नफा कमावत आहेत का? Cian Agro च्या कारभारात पारदर्शकता आहे का? याची चौकशी व्हायला हवी.”याचबरोबर त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.“राजकीय पाठबळ असलेल्या कंपन्यांना फायदा मिळतो आणि शेतकरी तसेच सामान्य गुंतवणूकदार अडचणीत सापडतात,” अशी टीका त्यांनी केली.

Cian Agro ही कंपनी कृषी प्रक्रिया व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीच्या निकालांमध्ये नफा वाढल्याचे समोर आले होते. त्यानंतरच सोशल मीडियावर कंपनीच्या शेअर किमतीपासून ते मालकी हक्कापर्यंत अनेक चर्चा सुरू झाल्या. राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे या विषयाला आता अधिकच वेगळं वळण मिळालं आहे.

सोशल मीडियावर #CianAgro हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, अनेक वापरकर्ते कंपनीच्या कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. कंपनीकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Updated : 30 Aug 2025 6:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top