Home > Top News > गोगावले राजीनामा द्या !!

गोगावले राजीनामा द्या !!

गोगावले राजीनामा द्या !!
X

मुंबई : महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाने फटकारलं आहे. कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यासह आरोपींना अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान मंत्री भरत गोगावले हे त्यांचा मुलगा विकास सोबत संपर्क साधून त्याला शरण येण्यास सांगतील, अशी माहिती महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. विकास गोगावलेंना उद्या (२३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश देण्यात आले असून राज्यातील कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची असल्याची न्यायालयानं म्हटलंय. याप्रकरणी उद्या सकाळी ११ वाजता न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने थेट मुख्यमंत्री आणि मंत्री गोगावले यांच्याकडून निर्देश घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यात या आरोपींवर गुन्हा दाखल झाला असूनही, अद्याप अटक न झाल्याने न्यायालयाने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. "कॅबिनेट मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतके असहाय्य आहेत की, त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यामुळे महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

“आपला मुलगा विकास हा फरार असून तो आपल्या संपर्कात आहे” मंत्री गोगावलेंचं हे वक्तव्य देखील न्यायालयात सादर करण्यात आले. तरीही अटक न झाल्याने सरकारच्या इच्छाशक्तीवरच न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थिती केलंय.

"सरकार कोणालाही २४ तासात अटक करू शकते. जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात," असे न्यायालयाने स्पष्ट मतं व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री गोगावले यांच्याकडून निर्देश घेऊन कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात न्यायालयाच्या भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढला असून, लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

Updated : 22 Jan 2026 8:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top