Home > Top News > प्रशासन अलर्ट मोडवर : बीडमध्ये संचारबंदीचा आदेश लागू - जिल्हाधिकारी दिपा मुघोळ‌ मुंडे

प्रशासन अलर्ट मोडवर : बीडमध्ये संचारबंदीचा आदेश लागू - जिल्हाधिकारी दिपा मुघोळ‌ मुंडे

प्रशासन अलर्ट मोडवर : बीडमध्ये  संचारबंदीचा आदेश लागू - जिल्हाधिकारी दिपा मुघोळ‌ मुंडे
X

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातवरण चिघळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी शांतेत कॅंडल मार्च आंदोलन सुरू होतं. कालपासून मराष्ट्रभरातून खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीच्या राजीनाम्याचं सत्र सुरू होतं. तर आता बीड जिल्ह्यातील या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. बीड मध्ये मराठा आरक्षण मोठ्या प्रमाणावर पेटले होते. त्यामुळं बीड मधील प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर व त्यांचसोबत जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज जिल्हात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या मोठ्या घटना घडल्याने १९७३चे कलम १४४ (२) लागू करण्यात आले आहे. अनिश्र्चित कालावधीसाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशी माहिती बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुघोळ‌ मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान आज आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय तसेच हॉटेल पेटवून देण्यात आली आहे. एसटी बसची तोडफोड करण्यात आली असून माजलगाव नगरपरिषद मोठं नुकसान आंदोलन कर्त्यांकडून करण्यात. राजकीय नेते व प्रशासन मधील आष्टीचे तहसील यांची शासकीय गाडी झालं. तर जालना जिल्ह्यातील तहसील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.

अनेक महामार्गावर टायर पेटवून आंदोलन सुरू केले होते. महामार्ग अडवून रोखून धरला होता. त्या मुळे महामार्गावर देखील संचार बंदी असणार आहे. या संचार बंदीत पाच व त्या पेक्षा अधिक नागरिकांना रस्त्यावर येण्यास प्रतिबंध असणार आहे.


Updated : 30 Oct 2023 7:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top