Home > Top News > आमीर खान आणि किरण राव चा घटस्फोट, घटस्फोटाचं कारण काय?

आमीर खान आणि किरण राव चा घटस्फोट, घटस्फोटाचं कारण काय?

Aamir Khan Kiran Rao Bollywood Aamir Khan Kiran Rao Divorce आमीर खान आणि किरण राव चा घटस्फोट, घटस्फोटाचं कारण काय?

आमीर खान आणि किरण राव चा घटस्फोट, घटस्फोटाचं कारण काय?
X

Aamir Khan Kiran Rao Divorce: बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव घटस्फोट घेत आहेत. या संदर्भात दोघांनीही एक जॉइंट स्टेटमेंट जारी केलं आहे. आमिर खान आणि किरण यांचा घटस्फोट त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बाब आहे. आमिर आणि किरण या दोघांनी 15 वर्षापुर्वी लग्न केलं होतं.

या संदर्भात त्यांनी जारी केलेल्या जॉइंट स्टेटमेंट मध्ये त्यांनी त्यांचे आर्थिक व्यवहार सुरु राहतील असं म्हटलं असून त्यांनी त्यांच्या मुलांचा एकत्रपणे सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे जॉइंट स्टेटमेंट मध्ये?

आमिर खान आणि किरण राव ने आपल्या जॉइंट स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे की...

या सुंदर 15 वर्षाच्या काळात आम्ही आमच्या जीवनातील अनुभव, आनंद एकमेकांसोबत शेअर केले. आमचं नातं विश्वास, सम्मान आणि प्रेमाने वाढलं. आता आम्हाला जीवनातील एक नवीन अध्याय सुरु करायचा आहे.

पती-पत्नीच्या रुपाने नाही तर आई वडिलांच्या रुपाने आणि परिवाराच्या रुपाने. आम्ही काही दिवसांपुर्वीच वेगळं होण्याचा एक प्लान सुरु केला होता. आता प्रत्यक्षात आणण्याचा विचार करत आहोत.

आम्ही दोघं वेगळे राहिलो तर एकमेकांना एक विस्तारीत परिवाराच्या रुपाने शेअर करत राहू. आम्ही आमचा मुलगा आझाद च्या प्रती एक समर्पित पालक आहोत. त्याचं पालन-पोषण दोघं मिळून करणार आहोत. आम्ही चित्रपट, पाणी फाउंडेशन आणि इतर योजनांमध्ये सहयोगी म्हणून काम करणार आहोत.

असं त्यांनी त्यांच्या जॉइंट स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे.


Updated : 3 July 2021 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top