Home > Top News > राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार

राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार

राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार
X

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांची बुधवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच सर्व पारंपरिक विद्यापीठांची संयुक्त बैठक आयोजित करू तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांसह राज्यातील कृषी विद्यापीठांना भेट देऊन तेथील संशोधनाची विस्तृत माहिती घेऊ असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांवरील भरती, विद्यापीठांमधील वैधानिक पदांची भरती, उच्च व तंत्रशिक्षण विभागाची पहिल्या १०० दिवसांमधील उपलब्धी, शिकाऊ उमेदवारी संलग्न पदवी अभ्यासक्रम, कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांमधील प्रशासन सुधार, सर्व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता, आदी विषयांवर चर्चा झाली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती आदी उपस्थित होते.

Updated : 18 Jun 2025 8:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top