Home > Top News > रायगड जिल्ह्यात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

रायगड जिल्ह्यात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

रायगड जिल्ह्यात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
X

राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा सहर सुरू आहे. याच परिस्थितीत रायगड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महाड तालुक्यातील तळई गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या गावात दरड कोसळल्याने त्याखाली ३२ घरं दबली गेली आहेत. यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० जण अजूनही बेपत्ता आहेत. तर साखर सुतार येथे ४ जणांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.



या दोन्ही ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यासह विधानस परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल जाले आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा त्यांनी आढावा घेतला. प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणाला भेट दिल्यानंतर ट्विट करुन माहिती दिली आहे.


"महाडनजिक असलेल्या गावांना पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने काहीजण मृत पावले आहेत,तळीये गावात ३० पेक्षा जास्त नागरिकांचे मृतदेह ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले आहेत! काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.NDRF आणि स्थानिक ग्रामस्थांकडून बचावकार्य सुरू आहे."




पावसामुळे या ठिकाणी मदत पोहोचायला अडथळे येत आहेत. तसेच महाड तालुक्यात पुराने तैमान घातल्याने आता इथून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांचे हेलिकॉप्टरने स्थलांतर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पण नागरिकांनीही आपापल्या घरांच्या छतावर किंवा उंच ठिकाणी जाऊन थांबले तर बचाव पथकांनी ते दिसू शकतील असे आवाहनही कऱण्यात आले आहे.





Updated : 23 July 2021 9:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top