Home > News Update > SwaraBhaskar स्वरा भास्कर प्रेग्नन्सी च्या बातमी वरून ट्रोल

SwaraBhaskar स्वरा भास्कर प्रेग्नन्सी च्या बातमी वरून ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)हिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी (Fahad Ahmed) लग्न केले आहे. ही बातमी स्वरा भास्करने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना दिली होती. स्वरा भास्करने 16 जानेवारीला तिच्या लग्नाची नोंदणी कोर्टात केली होती. या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता ज्यामध्ये ती कोर्ट मॅरेज केल्यानंतर डान्स करताना दिसत आहे.

SwaraBhaskar स्वरा भास्कर प्रेग्नन्सी च्या बातमी वरून ट्रोल
X

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)हिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी (Fahad Ahmed) लग्न केले आहे. ही बातमी स्वरा भास्करने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना दिली होती. स्वरा भास्करने 16 जानेवारीला तिच्या लग्नाची नोंदणी कोर्टात केली होती. या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता ज्यामध्ये ती कोर्ट मॅरेज केल्यानंतर डान्स करताना दिसत आहे.

खरंतर हा व्हिडिओ स्वरा आणि फहादच्या मित्राने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. मात्र स्वरा भास्कर आता मार्च महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. दरम्यान स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करून सोशल मीडिया वापरकर्ते स्वरा भास्कर प्रेग्नंट झाल्याचे सांगत आहेत. यासोबतच फोटोमध्ये स्वरा भास्करचा बेबी बंपही दिसत आहे. या फोटोमध्ये स्वरा भास्कर तिचा बेबी बंप तिच्या साडीत लपवताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच वादांच्या भोवऱ्यात सापडलेली स्वरा भास्कर पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे.

या संदर्भात भाजपची सोशल मीडिया योद्धा मिनू न्यूयॉर्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर स्वरा भास्करचा फोटो शेयर केला आणि कूछ दीखा.. ?? दीखा तो चूप रेहना. असे लिहिले आहे.


सोशल मीडियावर लोकांनी स्वराच्या या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. आणि तिला हे सत्य की असत्य ही देखील विचारले आहे. याबाबत स्वरा भास्करने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु यूजर्स तिच्या फोटोवर सतत मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.

तथ्य तपासणी

दरम्यान मॅक्स महाराष्ट्रने या बातमीचा आढावा घेतला आणि स्वरा भास्करला मोबाइलवर संपर्क केला असता “मी सध्या खुप व्यस्त आहे, तुम्ही मेसेज वर कळवा” अशी प्रतिक्रिया कॉल वर त्यांनी दिली. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्र ने त्यांना व्हॉटअप वर मेसेज करुन या बातमीची खातरजमा करण्याबाबत विचारणा केली. सोशल मिडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट देखील स्वराला पाठवून स्वरा प्रेग्नंट असल्याची बातमी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला. स्वराने MaxMaharashtra ने पाठवलेले सर्व मेसेज वाचले. परंतू ते वाचूनही त्यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही. हि बातमी अपलोड करेपर्यंत स्वराकडून काहीच प्रतिक्रीया आली नव्हती. त्यामुळे व्हायरल पोस्ट आणि बातम्याची आम्ही पुष्ठी करत नाही. परंतु स्वरा भास्करने याबाबत काही प्रतिक्रिया दिल्यावर या बातमी अपडेट नक्की करू.

Updated : 22 Feb 2023 2:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top