Home > रवींद्र आंबेकर > अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चुकीचं टायमिंग

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चुकीचं टायमिंग

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चुकीचं टायमिंग
X

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटाचं चित्रिकरण सुरू होतं तेव्हा पासून या चित्रपटातील काही सीन ‘चुकून’ व्हायरल करण्यात आले होते, आणि या चित्रपटाचे अभिनेते, आप मध्ये घुसून भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा राबवणारे कसदार अभिनेते अनुपम खेर यांनी ते सीन जाहीररित्या पोस्ट केले होते. अनुपम खेर अभिनेते म्हणून जितके महान आहेत तितकेच ते माणूस म्हणून नालायक असल्याचं त्याच दिवशी सिद्ध झालं होतं. आता असं काही लिहिल्यावर जर कुणी मला काँग्रेससमर्थक वगैरे म्हणणार असेल तर त्यांनी तसं खुशाल म्हणावं.

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर लोकसभा निवडणूकीच्या आधी रिलिज करायचा प्लान आधीच ठरला होता. लोकसभा निवडणूकीच्या काळात मनमोहन सिंह किती कमकुमत होते, सोनिया गांधी कशा वरचढ होत्या असं दाखवण्याचा प्लान होता. असं दाखवल्यानंतर राहुल गांधींचा आधीच पप्पू झालेल्या असल्याने स्पर्धेत आलेच तर मनमोहन आणि सोनिया किती वाईट राज्यकर्ते होते हे दाखवण्याचा हा प्रयत्न असणार होता. यामुळे नरेंद्र मोदींचं नेतृत्व एकदम मोठं, दैवी ठरणार होतं. प्लान अगदी योग्य होता, पण तेव्हा पप्पू पास झाला नव्हता, राफेल आलं नव्हतं, डिमॉनेटायजेशनच्या फोलपणाचे इतके रिपोर्ट आले नव्हते, रिजर्व बँकेच्या गव्हर्नरचा राजीनामा झाला नव्हता, आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलीय असं मोदींच्या जवळचेच लोक उघडपणे बोलत नव्हते, तीन राज्यांत सर्व ताकत पणाला लावूनही मोदींचा पराभव झाला नव्हता….

त्यामुळे हा जर वरचं सर्व झालं नसतं,तीन राज्यात पराभव झाला नसता तर हा चित्रपट अतिशय चपखल बसला असता आणि नरेंद्र मोदींना त्याचा प्रचंड फायदा झाला असता. मात्र, आधीच नरेंद्र मोदी संकटात असताना हा चित्रपट येतोय. त्यामुळे त्याच्या टायमिंगमुळे चित्रपटाचा इम्पॅक्टच गेलाय. मोदींची घरसलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा चित्रपट आणला गेलाय अशी लोकांची धारणा झालीय. मनमोहनसिंह यांना ज्यांनी बिनकामाचा, सोनियांच्या हातातील बाहुलं, फेल राजकारणी असं बोलून संभावना केली त्यांचं काम किती मोठं होतं हे आज भारतीयांना कळायला लागलंय. घसरत्या आर्थिक स्थितीत आज मनमोहन सिंह हवे होते असं अनेक अर्थतज्ज्ञ उघड बोलायला लागलेयत. सामान्य माणसांमध्येही कैसे भी था, पर सरदार अच्छा था अशी सहानुभूतीची भावना मी पाहिलीय. तिकडे सर्वशक्तीमान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात नितीन गडकरींनी उघड टीका करत नवीन मोर्चा उघडलाय. नरेंद्र मोदींची सोशल मिडीयावर अॅक्सिडेंट करणारे पंतप्रधान म्हणून खिल्ली उडवली जातेय. अशा परिस्थितीत सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्या मनमोहन सिंहांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो ते मनमोहन सिंह पुस्तक आलं तेव्हा ही आणि आता चित्रपट निघतोय तेव्हा ही शांत आणि संयमी आहेत. ते विचलित झालेले नाहीत, काही ही बोललेले नाहीत. त्यांच्या मौनाची अभेद्य भिंत तोडणं भारतीय जनता पक्षाला जमलं नाहीय, उलट त्यांनी या चित्रपटाच्या आधी आपल्या सहा पुस्तकांचं प्रकाशन करून जागतिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला, त्याचीच जास्त तारिफ होतेय.

थोडक्यात अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटाच्या टायमिंगमुळे या चित्रपटाच्या मागे असलेल्या ब्रेनचाच अॅक्सिडंट झालाय.

Updated : 29 Dec 2018 5:25 AM GMT
Next Story
Share it
Top