Home > राजदीप सरदेसाई > ओसरत्या लाटेतला निसटता विजय

ओसरत्या लाटेतला निसटता विजय

ओसरत्या लाटेतला निसटता विजय
X

बाबरी मस्जिदचा विध्वंस होण्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत असतानाच गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. हा निव्वळ योगायोग असू शकतो. ते योग्यही आहे, कारण तेव्हापासून आतापर्यंत भाजपा गुजरातमध्ये एकही निवडणूक हरलेली नाही आणि बाबरी मस्जिदच्या विध्वंसाला कारणीभूत ठरलेल्या रथयात्रेला याच राज्यातून सुरूवात झाली होती. त्या विध्वंसानंतर भाजपाला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. पण गुजरात हे हिंदूत्वाचे प्रमुख केंद्र राहीले. असे केंद्र जेथे मुळ हिंदूत्वाच्या प्रयोगशाळेत राजकीय नेत्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या चळवळीला आकार दिला.

आठवून बघा. नरेंद्र मोदी यांनीच १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथपासून रथयात्रेच्या पहिल्या टप्प्याचे नियोजन केले होते. तो त्यांचा राजकारणातील खरा उदय होता. राम मंदिर आंदोलनाचे नेते आणि वैचारिक आदर्श असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनीही भाजपा आणि गुजरात यांच्यात घट्ट नाते जोडण्यासाठीच त्यांचा लोकसभा मतदार संघ म्हणून गांधीनगरची निवड केली होती.

राम शीला पुजनमध्ये सहभागी झालेल्या कारसेवकांमध्ये गुजरातच्या कार्यकर्त्यांचाच मोठा भराणा होता. त्या काळात विश्व हिंदू परिषदेचे गुजरातमध्ये वर्चस्व होते. त्यांचे नेते प्रविण तोगडीया गुजरातमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती झाले होते. सन २००२ मध्ये गोध्रा ट्रेन हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचारातही विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्ते आघाडीवर होते. माफी न मागता प्रखर हिंदूत्व आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा असा राजकीय प्रयोग भाजपाने इतर कुठल्याही राज्यात केलेला नाही. हे वर्षही फार काही वेगळे नाही. भाजपा जरी सध्या विकास आणि गुजरात मॉडेलच्या यशाबाबत बोलत असली तरी, जनतेमध्ये धार्मिक ओळख कायम राखण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे. तसे नाही तर कॉंग्रेस सत्तेत आल्यास लतिफ (१९८० आणि ९० च्या दशकांत लतिफ नावाच्या गुंडाचे राजकीय नेत्यांनी उदात्तीकरण केले होते) राज चा सामना करावा लागेल, असा इशारा मतदारांना देण्याची वेळ मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यावर का आली? भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना भावनगरमधील सभेत रोहिंग्या मुसलमानांचा मुद्दा काढण्याची गरज का भासली? कॉंग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांच्या औरंगजेब राजचा उल्लेख करण्याची वेळ मोदींवर का आली? त्याचप्रमाणे स्थानिक भाजपा नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी यांचा उल्लेख 'HAJ' असा का करतात आणि कॉंग्रेस नेते अहमद पटेल हे मीयाँ असल्याची आठवण मतदारांना का करुन देतात?

भाजपाच्या हिंदूत्व अपीलाचा महिमा गुजरातमध्ये इतका प्रभावी आहे की, कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा जवळपास सोडून दिला आहे. २००२ मधील दंग्याचा उल्लेख केला तर पुन्हा हिंदू- मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होईल, या भितीपोटीच कॉंग्रेसचे नेते त्याचा उल्लेख टाळतात. राहूल गांधी यांच्या विविध देवळांना भेटी देण्याचे नियोजन अशा पद्धतीने केले आहे की, त्यातून कॉंग्रेस पक्ष हिंदू विरोधी नाही असा संदेश जावा.

असे असूनही गुजरातमध्ये धुळीच्या रस्त्यांवर बदलाचे वारे वहात असल्याने ही निवडणूक वेगळी ठरत आहे. पाटीदार समाजासाठी आरक्षणच्या मागणीचा वाढता जोर दाखवत आहे की, अखंड, एकसंघ हिंदूत्ववादी देश या संकल्पनेला आता तडे पडू लागले आहेत. जीएसटी अंतर्गत लावण्यात आलेले कर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांचा व्यक्त होत असलेला राग हेच दर्शवतो की, ज्या राज्यात व्यापार हाच प्रमुख मुद्दा आहे तेथे सरकारचा हस्तक्षेप आवडलेला नाही. जेव्हा सौराष्ट्रमधील कापूस उत्पादक कापसाला किमान दर मिळण्याची मागणी करतात, जेव्हा मेहसाणामधील विद्यार्थी खासगी संस्थांच्या भरमसाठ फी विरूद्ध आंदोलन करतात, जेव्हा सुरतमधील व्यापारी छातीठोकपणे सांगतात की, गांधीनगरमध्ये लाच दिल्याशिवाय काहीच होत नाही, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, गुजरातमध्ये आता हिंदू-मुस्लिम राजकारणाला फारसा वाव राहीलेला नाही. भाजपाच्या २२ वर्षांच्या अनभिषिक्त सत्तेनंतर आता तेथे प्रस्थापितांविरुद्ध नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

त्यामुळेच भाजपाला गुजरातमध्ये आता आपले ब्रम्हास्त्र वापरण्यास भाग पडत आहे. ते म्हणजे मोदी यांचे मी भूमीपुत्र आणि सर्व गुजराथ्यांसाठी ते गर्व करण्यासारखे असल्याचे आवाहन! मोदी यांचा करिष्मा काही प्रमाणात कमी झाला असला तरी केंद्रातले सरकार गांधीनगरच्या विरोधात कधीही जाणार नाही आणि झाला तर या सरकारकडून फायदाच होईल, ही भावना मात्र कायम आहे. शहरी भागातले गुजराती भाजपाला आणखी एक संधी देण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला ही निवडणूक जिंकता येईल. पण ही निवडणूक जिंकली तरी भाजपाला हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांची गुजरातवरील पकड सुटत आहे. हार्दिक पटेल सारख्या नेत्याच्या सभांना होणारी अलोट गर्दी हा तरूण गुजराती मतदाराला गृहित धरता येणार नसल्याचा पुरावा आहे. यापुढे धर्माचे राजकारण उलटण्याची शक्यता जास्त आहे.

ता.क. – सुरतमधील व्यापाऱ्यांचा एक गट, भाजपाचे पारंपरिक हितचिंतक-पाठराखे भाजपाला रागातच मत देईल. त्यामुळे जेव्हा मी विचारले की, तुम्ही कोणाला मत देणार? उत्तर असे मिळाले वोट तो बाजेपी को ही देंगे.. हम नाराज है, गद्दार नही”.

Updated : 8 Dec 2017 8:46 AM GMT
Next Story
Share it
Top