Home > पर्सनॅलिटी > सलमान खान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका

सलमान खान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका

सलमान खान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका
X

भारताच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने विशेष छाप पाडणारे तानाजी मालुसरे या शूर सैनिकाचे पराक्रम आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तानाजी : द अनसंग वाॅरिअर असे या चित्रपटाचे नाव आहे. अजय देवगन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अजयने तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका सलमान खान साकारणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. सलमान खान या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. याची अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी सूत्राच्या दिलेल्या माहितीनुसार सलमान खान यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, सैफ अली खान या चित्रपटात राजपूत योद्धा उदयभान राठोड यांची भूमिका साकारणार आहे. तर काजोल तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

Updated : 19 Oct 2018 8:18 AM GMT
Next Story
Share it
Top