Home > पर्सनॅलिटी > नशीबवान प्रकाश...

नशीबवान प्रकाश...

नशीबवान प्रकाश...
X

प्रकाश धुरी म्हणजे आत्ताच प्रकाश पटेल. हे तुम्हाला पुढे कळेल की प्रकाश धुरीचा प्रकाश पटेल कसा झाला.

ही गोष्ट आहे साधारण 1996-97 ची तेंव्हा माझ्या वडिलांचं पोस्टिंग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होते.ते नॅशनल पार्क चे incharge होते.तिथे आम्ही तिथल्या सरकारी बंगल्यात राहत होतो.खूप मोठा बांगला होता समोर आणि आजूबाजूला मोठे गार्डन होते आणि बंगल्याच्या अगदी समोर एका मोठ्या पिंजऱ्यात दोन बिबळे(leopard)वाघ होते राजा आणि राणी.गार्डन आणि घर मोठे असल्यामुळे बरीच लोक तिथे कामाला होती.सावित्री मावशी,पुष्पा,गीता,भागा,भगवान,अंकुश,रातीलाल,मोकळं,अरुण,आणि प्रकाश.हे सगळे घरी,गार्डन मध्ये आणि watchman म्हणून असायचे.

प्रकाश या सगळयान मध्ये छोटा होता.तो 4-12 वाजेपर्यंत घरात ड्युटी वर असायचा.प्रकाश खूप लाघवी होता,आणि काहीतरी कुरापती करून सगळ्यांना हसवायचा.घरी गणपती यायच्या आधी गणपती चे सर्व decoration तो खूप आवडीने आणि सुंदर करायचा,तो त्याचा आवडत छंद.

मी एकदा प्रकाश ला विचारले काय रे प्रकाश तू लेबर quarter ला राहतो की नवापाड्यात?तो म्हणाला नाही दादा मी कॅन्टीन मध्ये राहतो(तेंव्हा नॅशनल पार्क मध्ये बरेच कॅन्टीन होते)अरे...मग मी प्रकाश बद्दल इतर लोकांकडून माहिती घेतली.पुष्पा म्हणाली दादा प्रकाश ला या जगात कोणीच नाही त्याचे वडील तो 8-9 वर्षाचा असतांनाच वारले आणि आई 3 वर्षा पूर्वी वारली.ते दोघे नॅशनल पार्क मधेच कामाला होते त्यांना कोणीही नातेवाईक नव्हते.प्रकाश आधी आई वडिलांसोबत स्टाफ quarter ला राहायचा पण ते वारल्यानंतर त्याला राहायला घर नाही म्हणून तो कॅन्टीन मध्ये त्याची बॅग ठेवतो आणि फक्त रात्री झोपायला जातो कॅन्टीन मध्ये.आधी त्याला कुणीतरी जेवू घालायचे आणि तो पार्क मधेच फिरायचा पण हल्लीच तो रोजंदारीवर येथे कामाला लागला आहे... त्या दिवशी माझे हृदय पिळवटून निघाले आणि मी खूप अस्वस्थ झालो पण ठरवले की आता प्रकाश ला पूर्ण set करायचे.

मोहीम सुरू झाली ,आधी प्रकाश ला लेबर quarter मध्ये रूम मिळवून द्यायची होती.मी फॉरेस्टर आणि गार्ड ला विचारले एखादी रूम आहे का रिकामी?त्यांनी सांगितलं दादा रूम फुल्ल आहेत पण एका रूम मध्ये लायन सफारी ची आणि मिनी ट्रेन ची तिकीट व काही जुन्या फाइल्स आहेत ती एकाच रूम आहे.मी वडिलांच्या मागे लागलो त्या रूम मधील सर्व सामान ऑफिस मध्ये shift करा आणि प्रकाश ला ती रूम द्या.अण्णांनी (माझे वडील)प्रकाश बद्दल सर्व ऐकून घेतले आणि ताबडतोब ती रूम रिकामी करून प्रकाश ला द्यायला सांगितली.रूम मिळाल्या नंतर मी तिची रंग रंगोटी करून प्रकाश ला दिली.त्याचा राहण्याचा प्रश्न सुटला होता.

नंतर डोक्यात विचार आला याचे लग्न करून दिले तर ....बस ठरले आता प्रकाश चे लग्न करायचे.मी पार्क मध्ये सर्वांना सांगितले प्रकाश साठी मुलगी शोधा. आता मी सांगितल्या नंतर युद्ध पातळीवर पूर्ण पार्क चे लोक मुलगी शोधायला लागले.☺☺

त्यात एक विचित्र किस्सा झाला.पुष्पा म्हणाली दादा एक खूप दिसायला छान आणि कष्टाळू मुलगी आहे ती पार्क मध्ये राहते आई वडिलां सोबत आणि अभिनव नगर मध्ये कमला जाते.तिचे वडील खूप दारुडे आहेत काहीच काम करत नाहीत आणि आई वेडसर आहे ती फक्त पार्क मध्ये फिरते.ही मुलगीच काम करून त्या दोघांना सांभाळते आहे.मी म्हणालो चांगले आहे त्या मुलीच ही भल होईल तिच्या वडिलांना बोलावं माझ्याकडे मी बोलतो त्यांच्याशी.दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझी रिव्हॉल्वर बाहेर व्हरांड्यात बसून साफ करत होतो.त्या मुलीचे वडील खूप दारू पिऊन बंगल्यावर आले त्याला काहीच कळत नव्हत, मी लग्ना बद्दल बोललो तर तो बडबड करायला लागला.त्याला सांगितल की बाबारे दारू न पिता ये तर आपण लग्नाच बोलू तुझ्या मुलीच ही भल होईल.तो तिथून गेला पण थेट पोलीस स्टेशन ला😊😊आणि तिथे तक्रार केली की समीर भरती नि मला रिव्हॉल्वर दाखवून माझ्या मुलीच लग्न प्रकाश शी करून दे म्हणून धमकावले.झाल घरी एक PSI आले आणि म्हणाले तुमच्या विरुद्ध तक्रार आहे तुम्ही पोलीस स्टेशन ला चला.मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.शेवटी वडिलांना फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला.ते हसले आणि म्हणाले थांब मी फोन करतो तुला.थोड्या वेळाने श्री झरेकर यांचा फोन आला ते तिथे DCP होते,ते त्यां PSI शी बोलले आणि ते PSI निघून गेले.

एव्हडे होऊनही प्रकाश साठी वधू शोधायची मोहीम काही थांबली नाही.

पुष्पा गुजराथी होती तिने सांगितले दादा माझ्या एका नातेवाईकांची मुलगी आहे ते खूप गरीब आहेत लग्नाच तुम्हालाच बघायला लागेल.मी म्हणालो प्रकाश ला मुलगी दाखवा आवडली तर मी बघतो बाकीच.त्याला ती आवडली..इथे परत एकदा प्रकाश च नशीब जोरात होत.मी सगळ हे करतो आहे हे पाहून पुष्पा ची भाभी(सख्या भावाची बायको)आणि भावाने मला येऊन सांगितलं दादा आम्ही दोघेच आहोत आम्हाला मूलबाळ नाही आम्ही पर्कातच काम करतो आणि शिवाय ज्या मुलीशी तुम्ही प्रकाश च लग्न लावून देत आहात ती आमची नातेवाईक आहे.आमची इच्छा आहे की प्रकाश ला आम्ही दत्तक घ्यावे..वा क्या बात.. हे तर सोन्याहून पिवळं झाल. पुष्पा च्या भाभी च नाव जस्सु पटेल त्यांनी प्रकाश ला दत्तक घेतले आणि प्रकाश धुरी चा प्रकाश पटेल झाला.त्याला आई वडील मिळाले आणि भाभी ला मुलगा.

1997 साली मी प्रकाश च लग्न करून दिल अगदी जोरात. सतीमाता मंदिरा समोर मोठा मांडव टाकला,पूर्ण नॅशनल पार्क चे लोक जणू त्यांच्या घरचच लग्न आहे असे समजून काम करत होते.पूर्ण पार्क चे लोक आणि बाहेरचे,सर्वांचे जेवण,आहेर,मुला मुलीचे कपडे,दागिने,मंगळसूत्र सर्व काही जोरात..अश्या प्रकारे प्रकाश ला आई वडील,बायको दोघे मिळाले.

प्रकाश ला 2 मूल झाली आणि ती आता इंजिनीरिंग करत आहेत इथेच मुंबईत आणि तो...प्रकाश आपल्या आई वडील बायको मुलांच्या मध्ये रमून गेला आहे.आजही पार्कात गेलो तर भेटतो किस्से सांगतो,हसवतो....

खरच खूप नशीबवान आहे तो

परत एकदा त्याला कुटुंब भेटलं......

Updated : 23 Oct 2018 6:29 AM GMT
Next Story
Share it
Top