Home > पर्सनॅलिटी > सुनील रायथाथा

सुनील रायथाथा

सुनील रायथाथा
X

सुनील रायथाथा यांचं नाव उद्योग जगतात सन्मानाने घेतलं जातं. रायथाथा यांचा जन्म जालन्यात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी इंजिनिअरींगमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. लार्सन अँड टुब्रोमध्ये त्यांनी चर वर्षे काम केलं, या चार वर्षांत जे प्रशिक्षण मिळालं त्याच्या जीवावरच आपण हे यश मिळवू शकलो असं ते मानतात. सुरूवातीपासूनच स्वत:चा उद्योग सुरू करायचा या एकमेव ध्येयाने त्यांनी काम सुरू केलं. औरंगाबादमध्ये असताना तीन मित्रांनी मिळून उद्योग सुरू केला, पण तो काही चालला नाही. तेव्हा तो उद्योग पार्टनरकडे सोपवून सुनील रायथाथा बाहेर पडले. जालनामध्ये येऊन त्यांनी काही उद्योग सुरू केले. त्यात १५-१६ वर्षे गेली. १९९६ मध्ये आपली गाडी नीट रूळावर आली असं रायथाथा सांगतात.

नवीन उद्योग सुरू केला त्यात रोटेशनल मशिन्स बनवायला सुरूवात केली. २००१ साली पहिली मशीन निर्यात केली. आज जगाच्या पाठीवर ५५ देशांमध्ये रायथाथा यांच्या विनोद राय इंडस्ट्रीच्या मशीन्स जातात. रायथाथा यांचा उद्योग म्हणजे जालनातील प्रशिक्षण केंद्रच आहे. त्यांच्या ११ माजी कामगारांनी स्वत:चे उद्योग सुरू केलेत. या कामगारांच्या उद्योगांकडूनच विनोद राय इंडस्ट्रीला लागणारा बराचसा माल घेतला जातो.

सामाजिक देणं चुकवण्यासाठी सुनील रायथाथा शालेय विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे ही देतात. जलसंधारणाच्या कामांमध्ये स्वत: भाग घेतात.

रायथाथा यांची राजकीय मते सुद्धा परखड आहेत. त्याच्या मते 'राईट टू अर्न' चा अंमल जिथे झालाय तिथे लोकांना स्वतंत्र मतं असतात. आर्थिक स्वातंत्र्य असेल तरच लोक स्वतंत्र वागू शकतात. देश स्वतंत्र आहे, पण लोकांची मनं स्वतंत्र नाहीत. राजकारणीच सर्वकाही आहेत अशी भावना लोकांची आहे. नेता लग्नाला किंवा मयतीला आला की तो चांगला आहे असं लोक मानतात. नेत्यांना व्हिजन नसल्यामुळे विकासाला मर्यादा येतात.

  • रवींद्र आंबेकर

Updated : 16 Feb 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top