Home > News Update > पुण्यातील युवा सेना कार्यकर्त्यांनी स्वतः बुजवले खड्डे

पुण्यातील युवा सेना कार्यकर्त्यांनी स्वतः बुजवले खड्डे

पुण्यातील युवा सेना कार्यकर्त्यांनी स्वतः बुजवले खड्डे
X

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क येथील वडजाई चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त होते. मागणी करूनही प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात नव्हत्या. याचा निषेध म्हणून युवा सेना कार्यकर्त्यांनी या रस्त्यातील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवले आहेत

उपजिल्हाप्रमुख नागेश साखरे यांच्या पुढाकाराने युवा सेनेने ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त या रस्त्याच्या अनेक भागात खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख नागेश साखरे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हे खड्डे कधी मुजवणार याची सामान्य पुणेकर वाट पाहत आहेत.

Updated : 31 July 2023 9:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top