Home > News Update > योगामुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळाले – नरेंद्र मोदी

योगामुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळाले – नरेंद्र मोदी

योगामुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळाले – नरेंद्र मोदी
X

योगामुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळाले, अनेक डॉक्टरांनी स्वतः योगा करून कोरोनावर मात केली, रुग्णांवरही उपचार केले,असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक महामारी कोरोना संकटात योगाचं अनन्य साधारण महत्व असून निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळून सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

" अवघं विश्व करून अशी लढत असताना भारतीयांसाठी योगा आशेचा किरण ठरला आहे.महामार्गाच्या संकटात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम 'योगा फॉर वेलनेस'ने करोडो लोकांमध्ये चेतना निर्माण केली आहे ," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा असं सांगत मोदींनी एकमेकांची ताकद बनूयात असं आवाहन केलं. योगाने संयमाची शिकवण दिली असल्याचंही यावेळी ते म्हणाले. "करोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे," असं मोदी म्हणाले.

" अचानक पणे कोरोनाविषाणू ने जगाला तयारी नसताना धडक दिली अशा कठीण काळात आत्मशक्तीच्या मार्गाने मनोबल वाढले मला आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग आहे कोरोना पासून त्यांनी सुरक्षा कवच बनवले असे सांगितले आणि डॉक्टरांनीही स्वतःसाठी आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला आजारातून बाहेर पडल्यानंतर उर्वरित आयुष्यासाठी ही योगा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले."

"जेव्हा भारताने योग दिनाचा प्रस्ताव जगापुढे ठेवला तेव्हा ते योगाचा जगभरात प्रचार आणि प्रसार व्हावा अशी अपेक्षा होती. आज त्या दिशेने अजून एक पाऊल टाकत भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून 'MYoga' अॅप आणलं आहे. कॉमन योगा प्रोटोकॉलच्या अंतर्गत वेगवेगळ्या भाषेतील व्हिडीओ येथे उपलब्ध होतील. यामुळे जगभरात योगाचा विस्तार होण्यासाठी तसंच जगाला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका निभावली जाईल," असा ठाम विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

केवळ योगाच नाही तर योग ते सहयोगचा मंत्र मार्गाने माणुसकीला बळ मिळेल करेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1djxXqoqDLoKZ?s=09

Updated : 21 Jun 2021 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top