Home > News Update > योगींनी केलं मोदींना गायब ?

योगींनी केलं मोदींना गायब ?

योगींनी केलं मोदींना गायब ?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या नाहीत यावरून सोशल मिडीयावर बरीच चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आणखी एक चर्चा सुरू झालीय ती आहे, उत्तर प्रदेश भाजपा च्या ट्वीटर हँडल वर पंतप्रधानच काय भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा फोटो नसल्याची.



उत्तर प्रदेश भाजपा ने प्रसिद्ध केलेल्या अनेक ग्राफिक्स वरही पंतप्रधान तसंच पक्षाच्या अध्यक्षांचे फोटो आढळून आलेले नाहीत. भाजपच्या इतर सर्व राज्यांच्या ट्वीटर हँडल वर मात्र पंतप्रधान आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे फोटो आवर्जून लावण्यात आलेले आहेत.












भाजपा मोहन भागवतांना फॉलो करत नाही

भाजपाशी संबंधित सर्व ट्वीटर हँडल्स तपासत असताना आणखी एक गोष्ट लक्षात येते की, भाजपा चे प्रमुख ट्वीटर हँडल फक्त तीन व्यक्तींना फॉलो करतं. पक्षाचे नेते लालकृष्ण आडवाणी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ही या हँडलवरून फॉलो केले जात नाही.



Updated : 7 Jun 2021 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top