Home > News Update > Yervada Building Collapsed : पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांचा मृत्यू

Yervada Building Collapsed : पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांचा मृत्यू

पुणे शहरातील येरवडा शास्रीनगर (Yervada-Shasrinagar) भागात इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला असून 10 लोकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

Yervada Building Collapsed : पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांचा मृत्यू
X

राज्यात गेल्या काही दिवसात इमारत दुर्घटनांचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच पुणे शहरातील येरवडा शास्रीनगर भागात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने पाच लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणे शहरातील शास्रीनगर भागात इमारत कोसळल्याने 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दहा कामगार गंभीर जखमी आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती आहे. त्यामुळे अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.

येरवडा परिसरातील शास्रीनगर चौकात वाडिया बंगल्याच्या आठ नंबर गेटजवळ ही घटना घडली. मात्र या इमारतीच्या तळमजल्यावर काम करणारे कामगार गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी ट्वीट करत दुर्घटनेची आणि बचावकार्याची माहिती दिली.



येरवडा परिसरात घडलेल्या इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाच्या चार तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर दुर्घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तर अग्निशमन दलाचे बचाव पथक स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जुलै 2016 मध्ये पुण्यातील बालेवाडी येथे अशाच प्रकारे इमारतीचा स्लॅब कोसळून कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षात कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर दुर्लक्षच सुरू असल्याचे समोर येत आहे. तर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा केला नव्हता, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

या दुर्घटनेवरत मृत पडलेल्या कामगारांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केली.



Updated : 13 Jun 2022 9:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top