Top
Home > News Update > अभिनेता उमेश कामत 'आज तक' वर का संतापला?

अभिनेता उमेश कामत 'आज तक' वर का संतापला?

अभिनेता उमेश कामत आज तक वर का संतापला?
X

अभिनेता उमेश कामत यांने आज तक न्यूज चॅनेलने बेजबाबदार पत्रकारिता केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर या चॅनेलवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म बनवण्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. या प्रकरणात इतरही काही लोकांची नावे समोर आली आहे. यामध्ये उमेश कामत नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. यासंदर्भातले वृत्त देताना आज तक ने त्या आरोपीऐवजी आपला फोटो वापरला, अशी तक्रार उमेश कामतने केली आहे. उमेश कामतने यासंदर्भात फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसेच आज तक वरील कार्यक्रमाचे स्क्रीनशॉट्सही यामध्ये जोडले आहेत."आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत' याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.." - उमेश कामतउमेश कामतच्या या पोस्टवर काही मराठी कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जितेंद्र जोशी – "अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कृपया योग्य ती कारवाई कर. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत मित्रा"

समीर चौगुले – "निर्लज्ज आहेत हे...Ridiculous"

ह्रषिकेश जोशी – "अरे हे भीषण आहे"

सीमा देशमुख – "किती भयानक आहे हे...अतिशय बेजबाबदार आणि चुकीचे आहे हे..."

या प्रकारानंतर मराठी कलाकारांच्या वर्तुळात संपात व्यक्त होत असल्याचे दिसते आहे.

Updated : 2021-07-22T10:45:56+05:30
Next Story
Share it
Top