Home > News Update > Tareq Fateh : पंजाबचा सिंह आणि भारताचा सुपूत्र म्हणणारे पाकिस्तानी लेखक तारीक फतेह यांचे निधन

Tareq Fateh : पंजाबचा सिंह आणि भारताचा सुपूत्र म्हणणारे पाकिस्तानी लेखक तारीक फतेह यांचे निधन

Writer Tareq Fateh : फाळणीमध्ये पाकिस्तानात गेलेल्या कुटूंबात जन्म झालेले मात्र मी भारताचा सुपूत्र म्हणणारे पाकिस्तानी लेखक तारीक फतेह यांचे निधन झाले.

Tareq Fateh : पंजाबचा सिंह आणि भारताचा सुपूत्र म्हणणारे पाकिस्तानी लेखक तारीक फतेह यांचे निधन
X

पाकिस्तानी वंशाचे परंतू भारतावर प्रेम असलेले लेखक आणि पत्रकार तारीक फतेह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी नताशा हिने ट्वीट करून दिली आहे. (Tareq Fateh passes Away)

तारीक फतेह नेहमी स्वतःला पंजाबचा सिंह, भारताचा सुपूत्र, कॅनडा प्रेमी, सत्याच्या पुरस्कर्ता आणि न्यायासाठी लढणारा वंचितांचा आवाज आहे. याच शब्दात नताशा हिने तारीक फतेह यांच्या निधनाची बातमी दिली. (Natasha Fateh Tweet)

नताशा हिने ट्वीट करून म्हटले आहे की, पंजाबचा सिंह, भारताचा सुपूत्र, कॅनडा प्रेमी, सत्याचा पुरस्कर्ता आणि न्यायासाठी लढणारा वंचितांचा आवाज तारीक फतेह यांचे निधन झाले आहे. त्यांचे क्रांतीकारी विचार ते सर्व लोक जिवंत ठेवतील जे तारीक फतेह यांना ओळखत होते.

तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता का? असंही नताशा यांनी म्हटले आहे.

नताशा यांनी आणखी ट्वीट करून म्हटले आहे की, बलुचिस्तान, कुर्दीस्तान आणि इराणच्या स्वातंत्र्यासाठी काय योग्य आहे? ते तारीक फतेह हे चांगलं जाणून होते.

कोण होते तारीक फतेह? (Who wasTareq Fateh)

तारीक फतेह हे पाकिस्तानात जन्म झालेले मात्र स्वतःला भारताचा सुपूत्र मानणारे लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी अनेकदा दहशतवाद आणि पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत होते. त्यांचं कुटूंब हे मुंबईत रहायचं. मात्र भारताची फाळणी झाली आणि फतेह कुटूंबाला पाकिस्तानात जावं लागलं. त्यानंतर दोन वर्षांनी तारीक फतेह यांचा जन्म झाला. त्यानंतर तारीक फतेह 1987 पर्यंत पाकिस्तानमध्येच राहत होते. मात्र त्यानंतर ते कॅनडात (Canada) स्थलांतरीत झाले. त्यांनी 1970 मध्ये पत्रकारिता आणि टीव्ही डिबेट शो होस्ट करायला सुरुवात केली.

तारीक फतेह यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना पाठींबा दिला होता. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी एकही गोळी न चालवता पाकिस्तानला उपासमारीच्या उंबरठ्यावर आणलं असल्याचे तारीक फतेह म्हणाले होते.

तारीक फतेह यांनी दोन वेळा जेलची वारी केली आहे. तारीक फतेह यांचे हिंदी, उर्दू, अरबी, इंग्रजी आणि पंजाबी या भाषांवर प्रभुत्व होते. ते मानवाधिकार कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जात. ते स्वतःला भारताचा सुपूत्र म्हणायचे. एवढंच नाही तर त्यांनी चेजिंग अ मिराज : द ट्रैजिक इल्लुझ़न ऑफ़ एन इस्लामिक स्टेट (Chasing a Mirage: The Tragic Illusion of an Islamic State) हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले. तसेच त्यांचा फतेह का फतवा शो वादात सापडला होता.

Updated : 25 April 2023 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top