Home > मॅक्स रिपोर्ट > पाहा, राज म्हणतायेत दाऊदला निवडणुकीच्या तोंडावर आणायचंय...

पाहा, राज म्हणतायेत दाऊदला निवडणुकीच्या तोंडावर आणायचंय...

पाहा, राज म्हणतायेत दाऊदला निवडणुकीच्या तोंडावर आणायचंय...
X

अखेर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपलं फेसबुक पेजचं लाँच केलंय. या सोहळ्यात राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधत केंद्र सरकार आणि मोंदीवर जोरदार टीका केली. यावेळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.. दाऊद इब्राहिमला भारतात स्वतःहून यायचंय, त्याची इच्छा आहे, सध्या त्याच्याशी चर्चा चालू आहे, त्याला भारतात आणून आम्ही ओढून आणल्याचे दावे भाजप सरकार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करणार असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय...

दाऊदला स्वत:ला भारतात यायचंय. त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. आगामी निवडणुका याच विषयावर भाजप जिंकेल असा गंभीर आरोप देखील राज ठाकरेंनी केलाय..राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण ऐका.....

https://youtu.be/M8ysHvw9iBI

Updated : 21 Sept 2017 1:31 PM IST
Next Story
Share it
Top