Home > News Update > महिला कुस्तीपटूंचं लक्षवेधी आंदोलन मागे, आता लढाई न्यायालयात

महिला कुस्तीपटूंचं लक्षवेधी आंदोलन मागे, आता लढाई न्यायालयात

महिला कुस्तीपटूंचं लक्षवेधी आंदोलन मागे, आता लढाई न्यायालयात
X

संपूर्ण क्रीडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलेल्या ऑलिंम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. मागील पाच महिन्यांपासून दिल्लीत हे आंदोलन सुरू होतं. याबाबत साक्षी मलिकनं ट्विट करून ही माहिती दिलीय. कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. सिंह यांना अटक करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी आंदोलनही सुरू केलं होतं. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकऱणी न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास ब्रिजभूषण सिंह यांनी नकार दिलाय.

Updated : 26 Jun 2023 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top