Home > News Update > छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य मागे घ्या, उदयनराजे यांनी राज्यपालांना खडसावले

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य मागे घ्या, उदयनराजे यांनी राज्यपालांना खडसावले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे राज्यपाल कोश्यारींना चांगलेच सुनावले.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य मागे घ्या, उदयनराजे यांनी राज्यपालांना खडसावले
X

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर कोश्यारी यांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. त्यापार्श्वभुमीवर वक्तव्य मागे घ्या, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांना सुनावले.

उदयनराजे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू असल्याचे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपुर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यापालांनी आपले वक्तव्य त्वरीत मागे घ्यावे, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.

औरंगाबाद येथील समर्थ परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामध्ये राज्यपाल म्हणाले होते की, आपल्या देशात गुरूची परंपरा मोठी आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. अगदी त्याप्रमाणेच समर्थ नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर चंद्रगुप्त असता का? असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून राज्यात नवा वाद पेटला आहे.

पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, मी शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असे नाही. पण ज्या माणसाला गुरू नाही. त्याची महती उरत नाही. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांच्या कृपेने स्वराज्य मिळाले, असे शिवाजी महाराज सांगतात. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समर्थांना स्वराज्याच्या चाव्या गुरुदक्षिणा म्हणून दिल्या होत्या, असे वक्तव्य राज्यपालांनी केले. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचे म्हटले आहे. तर शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीही हे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे.

Updated : 28 Feb 2022 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top