Home > News Update > बाप्पाच्या आशीर्वादाने काँग्रेसचे सरकार स्थापन होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा

बाप्पाच्या आशीर्वादाने काँग्रेसचे सरकार स्थापन होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा

बाप्पाच्या आशीर्वादाने काँग्रेसचे सरकार स्थापन होणार; यशोमती ठाकूर यांचा दावा
X

राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच, कॉंग्रेस नेत्या व आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केला आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे

दरम्यान यावेळी त्या बोलतं असताना म्हणाल्या की " राज्यात सुरू आहे तो वेडेपणा आहे. 99 टक्के सत्ताधारी राजकारण करीत आहेत, तर आम्ही समाजकारणाच्या जवळ आहोत, त्यामुळे पुढच्या वर्षी काँग्रेसचे सरकार येणार असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली. यावर देखील यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या "हा सत्ता कारणासाठी गोंधळ आहे. रोहित पवार ऍक्टिव्ह झाले आहेत, स्वतः रोहित पवार हे सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी भाजपच काम असेल किंवा त्यांच्या परिवारातील असेल अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Updated : 29 Sep 2023 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top