Home > News Update > Moonlighting चा दिग्गज आयटी कंपनीला फटका ; ३०० कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई

Moonlighting चा दिग्गज आयटी कंपनीला फटका ; ३०० कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई

Moonlighting चा दिग्गज आयटी कंपनीला फटका ;  ३०० कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई
X

ओव्हरटाईम किंवा जोडधंदा फ्रिलान्सींग आता भारतीयांना नवी नाही. पण मुनलाईटींग हा नव्या युगातला प्रकार म्हणजे एका कंपनीत काम करताना प्रतिस्पर्धी कंपनीसोबत काम करणं विप्रो कंपनीतल्या ३०० कर्मचाऱ्यांच्या अंगलट आलं आहे. विप्रोने कारवाई करत ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

विप्रोचे ३०० कर्मचारी मूनलाइटिंग करताना आढळले असून, त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी विप्रो कंपनीत काम करत असताना प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम करताना आढळून आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे कंपनी कठोर कारवाई करत आहे. कंपनीच्या या कठोर कारवाईमुळे आता मात्र ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे.

विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी बुधवारी सांगितले की, कंपनी ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. हे सर्व कर्मचारी मूनलाइटिंग करताना आढळून आले आहेत. ते म्हणाले की, हे कर्मचारी विप्रोमध्ये असताना इतर कंपन्यांसाठी काम करत होते. ऋषद प्रेमजी म्हणाले की, हे नियमांचे उल्लंघन असून आम्ही त्यांना काढून टाकले आहेत.

मूनलाइटिंगबाबत एकीकडे मतभेत होत असताना अनेकांनी कठोर भूमिका घेतली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इन्फोसिसने दुहेरी रोजगार किंवा 'मूनलाइटिंग' ला परवानगी नाही असे जाहीर केलं आहे. कराराच्या कलमांचे कोणतेही उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल "ज्यामुळे रोजगार संपुष्टात येऊ शकत असा इशारा कंपन्यांनी दिला आहे.

आता गुपचूप काम करणे महागात पडेल, दिग्गज IT कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला इशारा

ऋषद प्रेमजी यांनी बुधवारी असेही म्हटले की मूनलाइटिंगवरील त्यांच्या टिप्पण्यांसाठी त्यांना टीकेचा सामना करावा लागला असेल, पण तरीही ते या विषयावर त्यांच्या मतांवर ठाम आहेत. ऋषद प्रेमजी यांनी सर्वप्रथम मूनलाइटिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. भारतातील विप्रो, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्या मूनलाइटिंगच्या विरोधात आहेत. विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष म्हणाले की, मूनलाइटिंगची व्याख्या पाहिली तर ती इतर कामे गुप्तपणे करणे आहे. ते म्हणाले की, विप्रोमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी X, Y किंवा Z साठी काम करणाऱ्यांसाठी कोणाला जागा नाही. विप्रोमध्ये काम करणारे कर्मचारी इतर कंपन्यांसाठी काम करू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. हे पूर्णपणे नियमांचे उल्लंघन आहे आणि ते स्पष्ट आहे.

मूनलाइटिंग म्हणजे काय?

मूनलाइटिंग म्हणजे एका कंपनीत काम करताना दुसऱ्या कंपनीत काम करणे. सोप्प्याभाषेत बोलायचे तर जेव्हा एखादा कामगार त्याच्या नेहमीच्या कामापेक्षा इतर कोणासाठीही काम करतो तेव्हा त्याला मूनलाइटिंग म्हणतात. आयटी क्षेत्रासह इतर नोकऱ्यांच्या क्षेत्रात कर्मचारी आपले उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने इतर कंपन्या किंवा प्रकल्पांसाठी काम करतात. कंपन्यांच्या मते हे इंटिग्रिटी व्हायोलेशन (अखंडतेचे उल्लंघन) आहे. त्याचवेळी, बरेच लोक याला फ्रीलान्सिंग देखील म्हणतात.

Updated : 22 Sep 2022 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top