Home > News Update > वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार का ?

वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार का ?

वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार का ?
X

पुणे : मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. परंतु आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आले असता. त्यांना भेटण्यासाठी वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत.

पत्रकारानी त्यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का ? विचारल्यानंतर त्यावर त्यांनी साहेबाना भेटण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याशी देखील चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना मी खासदारकी साठी इच्छुक असल्याचे सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने मी साहेबाना भेटायला आलो असून ताकाला जावून भांड लपवणारा मी नाही. खासदार अमोल कोल्हे यांच्याशी मतदार संघाबद्दल चर्चा झाली असून मी त्यांच्या मतदार संघातील मतदार आहे. आता पक्ष प्रवेश आणि उमेदवारीसाठी निर्णय झाला नाही. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करू.

Updated : 14 March 2024 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top