Top
Home > Max Political > सोरेन सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहणारे राहुल गांधी ठाकरे सरकारच्या मंत्रीमडळ विस्ताराला येण्याचे टाळतायेत का?

सोरेन सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहणारे राहुल गांधी ठाकरे सरकारच्या मंत्रीमडळ विस्ताराला येण्याचे टाळतायेत का?

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणारे राहुल गांधी ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला हजर राहणार का? काय म्हणाले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण?

सोरेन सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहणारे राहुल गांधी ठाकरे सरकारच्या मंत्रीमडळ विस्ताराला येण्याचे टाळतायेत का?
X

आज हेमंत सोरेन यांनी झारखंड चे 11वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. झारखंड चे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी राँची येथे हेमंत सोरेन सह त्यांच्या मंत्र्यांना शपथ दिली.

सोरेन यांच्यासोबत कॉंग्रेस चे आलमगीर आलम, रामेश्वर ओराँव आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सत्यानंद भगत यांनी शपथ घेतली.

यावेळी देशातील सर्व विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, तृणमूल कॉंग्रेस च्या नेत्या ममता बनर्जी, सीपीआई चे नेते डी राजा, सीपीएम चे नेते सीताराम येचुरी आणि आम आदमी पार्टी च्या वतीनं संजय सिंह उपस्थित होते.

हे ही वाचा

‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’

‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल- केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान

ग्राऊंड रिपोर्ट : वाराणसीतील बजरडीहा, जिथे अजूनही घोर शांतता किंचाळत आहे

दरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ाला हजर नसणारे राहुल गांधी या ठिकाणी उपस्थित होते. विशेष म्हणजे (30 डिसेंबरला) आज ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. या मंत्रीमंडळ विस्ताराला आता राहुल गांधी उपस्थित राहणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

या संदर्भात आम्ही कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या एका जनसंपर्क अधिकाऱ्याने राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला येण्याची शक्यता सध्या तरी धुसरच आहे.

Updated : 29 Dec 2019 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top