Home > News Update > पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का ? केजरीवाल यांचं आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का ? केजरीवाल यांचं आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का ? केजरीवाल यांचं आव्हान
X

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या निवासस्थानाची सीबीआयने चौकशी करण्यात येणार आहे. यावर अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान केलं आहे. पंतप्रधान घाबरले आहेत, यावरून त्याची अस्वस्थता दिसून येते असल्याची प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली आहे

दरम्यान यावर बोलतं असताना केजरीवाल म्हणाले की " माझ्याविरुद्धची चौकशी काही नवीन नाही. गेल्या 8 वर्षात आतापर्यंत 50 हून अधिक प्रकरणांमध्ये माझ्याविरुद्ध चौकशी करण्यात आली आहे. शाळा घोटाळा, बस घोटाळा, दारू घोटाळा, रस्ते घोटाळा, पाणी घोटाळा, वीज घोटाळा यात केजरीवाल यांनी घोटाळा केला असल्याचे ते म्हणाले. जगात सर्वाधिक चौकशी माझी केली आहे कोणत्याही परिस्थितीत काहीही सापडले नाही. यातही काही सापडणार नाही. काहीही चूक नसताना काय मिळणार ? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.

यावेळी ते म्हणाले की "चौथी पास असलेल्या राजाकडून आणखी काय अपेक्षा करता येईल? 24 तास फक्त चौकशी-चौकशीचा खेळ खेळत राहा किंवा भाषणे देत रहा. कोणतेही काम करू नका. इतर नेते आणि पक्षांप्रमाणे मीही त्यांच्यासोबत यावे अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांनी माझ्या हव्या तितक्या खोट्या चौकशी किंवा हव्या तितक्या केसेस केल्या तरी मी त्यांच्यापुढे झुकणार नाही. असा टोला ही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

माध्यमांशी बोलतं असताना केजरीवाल यांनी मोदींना आव्हान दिले आहे. ज्याप्रमाणे आधीच्या सर्व चौकशीत काहीही सापडले नाही, त्याचप्रमाणे या चौकशीतही काही सापडले नाही, तर खोटी चौकशी केल्याबद्दल राजीनामा देणार का ? असा थेट सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे


Updated : 29 Sep 2023 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top