Home > News Update > पंकजा मुंडे यांचं ठरलं? राजकीय भूकंपाची शक्यता

पंकजा मुंडे यांचं ठरलं? राजकीय भूकंपाची शक्यता

पंकजा मुंडे यांचं ठरलं? राजकीय भूकंपाची शक्यता
X

भाजप (BJP) नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde) या राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत. “आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे” असं म्हणत त्यांनी एक फेसबुकला पोस्ट केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

“आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वत: हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये असं मी म्हटलं. आता पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे” अशी पोस्ट पंकजा यांनी केली आहे.

हे ही वाचा...

पंकजा मुंडे यांचं ठरलं? राजकीय भूकंपाची शक्यता

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

महिला सुरक्षेला प्राधान्य, पण सत्तेत सहभाग कुठाय?

१२ डिसेंबर हा दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंती आहे. या दिनाचं औचित्य साधून परळीजवळच्या गोपीनीथगडावर पंकजा मुंडे आपला राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि पंकजा यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांचा तब्बल ३० हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा सार्वजनिक जीवनात फारशा दिसल्या नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नेमका कोणता निर्णय घेतला आहे, त्या भाजपमधून बाहेर पडणार का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Updated : 1 Dec 2019 6:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top