Home > News Update > पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० साली पाण्याखाली जाणार? ; 'क्लायमेट सेंट्रल' चा अहवाल

पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० साली पाण्याखाली जाणार? ; 'क्लायमेट सेंट्रल' चा अहवाल

पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० साली पाण्याखाली जाणार? ; क्लायमेट सेंट्रल चा अहवाल
X

मुंबई : जागतिक तापमानवाढीचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जगातील अनेक शहरं २१०० पर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळू लागला आहे.त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या शहरांना याचा मोठा निर्माण झाला आहे. क्लायमेट सेंट्रल नावाच्या प्रकल्पाअंतर्गत जागतिक तापमान वाढीसंदर्भात एक अहवाल तयार करण्यात आला. जागतिक तापमानवाढीचा वेग आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार पुढील ९ वर्षांत ९ मोठी शहरं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यात भारतातील कोलकाता शहराचा देखील समावेश आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० पर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मान्सूनचा पाऊस आणि भरती यामुळे कोलकात्यात अनेकवेळा पूर परिस्थिती निर्माण होते. शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच होत नाही. त्यामुळे कोलकात्याला मोठा धोका आहे. याशिवाय समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्यानं दुहेरी संकट निर्माण झालं आहे.

तर, या अहवालानुसार नेदरलँडचे ऍमस्टरडॅम शहर, इराकचे बसरा शहर, अमेरिकेचे न्यू ओरलींस आणि सवाना शहर,इटली वेनिस शहर, व्हिएतनामचे हो ची मिन्ह शहर, थायलंडचे बँकॉक शहर, गयाना जॉर्जटाऊन शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

Updated : 5 Nov 2021 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top