Home > News Update > जितेंद्र आव्हाड साहेब 5000 रूपये भराल का ?

जितेंद्र आव्हाड साहेब 5000 रूपये भराल का ?

जितेंद्र आव्हाड साहेब 5000 रूपये भराल का ?
X

महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदीचा कायदा २०१८ पासून लागला आहे. तसेच प्लास्टिक वापरल्यास कायद्यानुसार ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

शिरूर तालुक्यातील केंदूर गावचा सुनील सुक्रे या शेतक-याने जितेंद्र आव्हाड यांना २०० किलोमीटर अंतरावरून मोटरसायकलने आणलेली शेतातली ताजी भाजी आणून दिली. आणि जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर त्या शेतकऱ्याची स्तुतीही केलेली आहे. ते व्हायलाही पाहिजे होते कारण त्या शेतकऱ्याने आपुलकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जे प्रेम दाखवले ते स्तुतिस्पद आहेच. पण या प्रकारात एक गोष्ट अनेकांना खटकली आणि ती म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर जे फोटो अपलोड केले आहेत त्यात प्लास्टिक कॅरीबॅग दिसतेय.

हे ही वाचा

टाटाचे कॅन्सरग्रस्त रुग्ण हिंदमातेच्या पुलाखाली

विद्यार्थी आंदोलनातून सत्तापालट होतो, याचा मोदींना पडला विसर !!!

“जेएनयू” च्या निमित्ताने….

सुनील सुक्रे यांने आनलेली भाजी शरद पवार यांना दिली. आणि पवार यांनी ती कौतुकाने आपल्या ट्रीटरवर टाकली. त्यावर आव्हाड यांनाही ही भाजी सुनील सुक्रे यांना दिली. त्याचे फोटो आव्हाड यांनी शेयर केले.या कॅरीबॅगेत भाजी आहे.

राज्यात प्लॅस्टीक बंदी कायदा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत यावर चर्चाही झाली. भविष्यासाठी प्लॅस्टीकचा वापर थांबला नाही तर माणसाचं जगणं मुश्कील होईल, हे सत्य आहे म्हणूनच हा कायदा सर्नानुमते आणण्यात आला . पण त्या अंमलबजावणी मात्र होत नाही. याचाच प्रत्यय या घटनेने आला आहे.

शेतक-याची मेहनत, त्याचं प्रेम ही एका बाजूला पण जिंतेंद्र आव्हड हे सर्वच बाबतीत आक्रमक असतात. महाराष्ट्रातला कायदा हा प्रत्येक नागरिकाला लागू आहे. त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनाही हा कायदा लागू आहे आणि ५००० रुपयांचा दंड भरायलाचं पाहिजे असं मत आता सोशल मिडीयात व्यक्त केलं जात आहे. खरं तर पाच हजार रूपये काही मोठी रक्कम नाही पण जितेंद्र आव्हाड आणि त्यांची लोकप्रियता मोठी आहे. म्हणूणच ते कायदा पाळणार नसतील तर त्याचा मेसेज चुकीचा जाणार आहे.

Updated : 22 Nov 2019 5:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top