Home > Max Political > खडसेंचा भाजपला राम राम ?

खडसेंचा भाजपला राम राम ?

खडसेंचा भाजपला राम राम ?
X

मी भाजपमध्ये राहणार की नाही हे मी सांगू शकत नाही असं वक्तव्य गोपीनाथ गडावर भाजपचे जेष्ठ नेते यांनी सांगितल्यानंतर 40 वर्ष भाजपमध्ये असलेले खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली . भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. आज सकाळी नागपुरात खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाल्याचे वृत्त असताना दुसरीकडे, मुक्ताईनगरात खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर हटविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमुळे खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एकनाथ खडसे हे भाजपच्या राज्य नेतृत्त्वावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी गोपीनाथ गडावर पक्षांतराचे संकेत दिले होते. तत्पूर्वी खडसेंनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीनंतर खडसेंनी आपण भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे. आज सकाळी त्यांनी नागपुरात शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची बोललं जातंय.

हे ही वाचा...

पुण्यात भीम आर्मीचं अर्धनग्न आंदोलन

….. कायद्यामुळे आसाममधील मूलनिवासी लोकांवर अन्याय

मुंबई महापालिकेत २९९ कोटींचा घोटाळा – आशिष शेलार

याच पार्श्वभूमीवर खडसेंच्या मुक्ताईनगरातील संपर्क कार्यालयावर असलेले भाजपचे बॅनर काढण्यात आल्याने खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाविषयी एकच चर्चा सुरू झाली आहे. काढण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे कमळ निशाण होते. हे बॅनर नेमके आताच का काढण्यात आले, त्यामागे नेमका काय हेतू आहे, अशा चर्चा सुरू आहेत.

Updated : 19 Dec 2019 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top