Home > News Update > शेतकरी आंदोलनाची योगी आदित्यनाथ यांना भिती का वाटते?

शेतकरी आंदोलनाची योगी आदित्यनाथ यांना भिती का वाटते?

शेतकरी आंदोलनाची योगी आदित्यनाथ यांना भिती का वाटते?
X

courtesy social media

तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आता भाजप विरोधात आंदोलन करणार आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात निवडणूका होत आहेत या निवडणूकांमध्ये शेतकऱ्यांनी भाजप विरोधात 'मिशन यूपी-उत्तराखंड' घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या या योजनेचा भाजपने देखील धसका घेतला आहे. त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांमध्ये जाऊन सरकारच्या कामाची माहिती देण्याचे आदेश भाजपच्या शिर्ष नेतृत्वाने दिले आहेत. भाजपच्या नेतृत्वाच्या शेतकरी नेत्यांच्या प्रचारामुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो. म्हणून भाजपने कोणतीही कसर न सोडता गावोगावी शेतकऱ्यांची संपर्क आणि संवाद साधण्याचं धोरण अवलंबलं आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये 5 सप्टेंबरला शेतकरी नेते 'मिशन यूपी-उत्तराखंड'ची अंतिम रणनीती तयार करणार आहेत. या मिशन अंतर्गत, संयुक्त किसान मोर्चाचे नेते संपूर्ण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जाऊन भाजपला मतदान न करण्याचे आवाहन जनतेला करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्याचा योगी सरकारने धसका घेतला आहे. भाजप आता 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वर्चस्व असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

भाजपचा किसान मोर्चा शेतकऱ्यांमध्ये थेट जाऊन बैठका घेणार आहे. या बैठकांमध्ये योगी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काम केले आहे. भाजप पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये किसान चौपालांचे आयोजनही करणार आहे. त्यानंतर 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान लखनौमध्ये एक विशाल किसान पंचायत आयोजित केली जाणार आहे.

राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

पश्चिम उत्तर प्रदेशातून आलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी योगी सरकारवर ऊसाला योग्य भाव न देणे, सर्वात महाग वीज, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर अनेक समस्यांवर योगी सरकारवर हल्ला करत आहेत. अलीकडेच जेव्हा लखनौला दिल्ली बनवले जाईल असे टिकैत यांनी म्हटले होते, तेव्हा भाजपने व्यंगचित्र जारी करून प्रत्युत्तर दिले होते. या व्यंगचित्रात लिहिले होते की सावधान, लखनौमध्ये योगी बसले आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनांमुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मोठे राजकीय नुकसान झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडापासून मथुरा, मेरठ, बागपत आणि बिजनोर, सहारनपूरपर्यंतच्या किसान महापंचायतींनी या भागातील भाजपचे राजकीय मैदान हादरवून टाकले आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशात 120 जागा आहेत आणि भारतीय किसान युनियन या भागात खूप सक्रिय आहे. या भागात भाजप नेत्यांचा सतत विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी मेरठच्या सिवलखास विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जितेंद्र सटवाई यांना शेतकरी आणि आरएलडी कामगारांनी जोरदार विरोध केला होता.

यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, मुझफ्फरनगरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री संजीव बाल्यांसह अनेक नेत्यांना शेतकऱ्यांच्या निषेधाचा सामना करावा लागला. त्यामुळं भाजप शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला कसं सामोरे जातं हे पाहावं लागेल.

निवडणुका जिंकण्यासाठी नड्डांच्या कार्यकर्त्यांना टिप्स

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा अलीकडेच दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान त्यांनी लखनौ आणि आग्रा येथील कार्यकर्त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी टिप्स दिल्या. नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते की, सर्व बड्या नेत्यांनी बूथ स्तरावर आयोजित कार्यक्रमांची जबाबदारी घ्यावी आणि मतदारांना पक्षाशी जोडण्याच्या मोहिमेत सहभागी करावे.

भाजपने पन्ना प्रमुखाची बैठक सुरू केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की संघटना मजबूत करण्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या भागात पन्ना प्रमुख केले जाऊ शकते.

Updated : 10 Aug 2021 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top