Home > News Update > सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या एकीने भाजप समोर आव्हान निर्माण करतील का?

सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या एकीने भाजप समोर आव्हान निर्माण करतील का?

सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या एकीने भाजप समोर आव्हान निर्माण करतील का?
X

आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षाच्या 19 पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, फारूक अब्दुल्ला, स्टालिन, ममता बॅनर्जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांसोबत एकजूट होण्याचा प्रयत्न केल्याचं या बैठकीतून दिसून येतं आहे.

या 19 पक्षांच्या झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना 2024 च्या निवडणुकांचे नियोजनबद्ध नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्या म्हणाल्या की, "सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने काम केले पाहिजे. सर्व पक्षांनी आपापल्या अडचणी बाजूला ठेवून पुढे येण्याची वेळ आली आहे."

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 19 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत व्हर्चुअल पद्धतीने बैठक घेतली. विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल सह बसपाच्या नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण नव्हतं.

बैठकीमध्ये, काँग्रेस व्यतिरिक्त टीएमसी, राष्ट्रवादी, द्रमुक, शिवसेना, जेएमएम, सीपीआय, सीपीएम, नॅशनल कॉन्फरन्स, आरजेडी, एआययूडीएफ, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आरएसपी, केरळ काँग्रेस (एम), पीडीपी आणि आययूएमएल या पक्षाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून सोनिया गांधी व्यतिरिक्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि खासदार राहुल गांधी देखील बैठकीला उपस्थित होते.

यावेळी सोनिया गांधी पुढे म्हणाल्या...

" एका उद्देशासाठी काम करा. जे देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि आपल्या संविधानाच्या तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देईल."

"आता निश्चित ती वेळ आली आहे. जेव्हा आपल्या राष्ट्राच्या हितासाठी अडचणी बाजूला एकत्र येण्याची ही ती वेळ आहे. 2024 ची निवडणूक हे 'अंतिम ध्येय' आहे."

'हे एक आव्हान आहे, पण आपण एकत्र पुढे जाऊ शकतो कारण एकत्र काम करण्याशिवाय पर्याय नाही."

दरम्यान, शुक्रवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी विरोधी एकजुटीवर भर देण्याबरोबरच पेगासससह इतर मुद्द्यांद्वारे सुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधला.

पुढे त्या म्हणाल्या - "भारताच्या स्वातंत्र्याची 75 वं वर्ष खरोखरच आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक संकल्प करण्याची हा सर्वात योग्य प्रसंग आहे."

काय आहे पार्श्वभूमी?

विरोधी पक्षांच्या या बैठकीपूर्वी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांसोबत बैठक घेतली होती. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना भाजपविरोधात मोर्चेबाजी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच दिल्ली दौऱ्यातही विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला होता. यासोबतच, राष्ट्र मंच नावाच्या संघटनेची बैठकही दिल्लीत झाली होती तसेच या बैठकीला सर्व विरोधी पक्षांचे नेते सहभागी होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही ही एकजूट कायम होती.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार विरोधकांच्या हल्ल्यांनी चांगलेच घेरले गेले होते. त्यातच शेतकरी आंदोलन आणि पेगासस हेरगिरी प्रकरणाने अजूनही सरकारचा पाठलाग सोडलेला नाही. यावेळी, पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले दिसले.

नुकतंच, तुरुंगातून बाहेर आलेले आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अखिलेश यादव यांची भेट घेऊन विरोधकांच्या एकजुटीवर भर दिला होता.

दरम्यान, विरोधी पक्षांना हे माहित आहे की 2022 मध्ये भाजपला रोखणे आवश्यक आहे, विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये. कारण, जर भाजपला उत्तर प्रदेशात विजय मिळाला तर तो 2024 पर्यंत ते वेगाने पुढे जातील. जर विरोधकांचा पराभव झाला तर त्याचा मार्ग कठीण होईल. साधारण 2022 मध्ये सात राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्यापैकी पाच निवडणुका 2022 या वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहेत.

Updated : 20 Aug 2021 4:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top