Home > News Update > बैलगाडा शर्यत का हवी आहे?

बैलगाडा शर्यत का हवी आहे?

बैलगाडा शर्यत का हवी आहे?
X

बैलगाडा शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने बैलगाडी शर्यंतीवर महाराष्ट्रात बंदी आहे. पेटा या संस्थेने बैलाच्या होणाऱ्या छळाबाबत याचिका दाखल केली होती. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलाचा छळ केला जात असल्याचा आरोप या पेटा या संस्थेने केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती थांबली. ती आजतागायत थांबलेलीच आहे.

तेव्हा पासून शेतकरी बैलगाडा शर्यत आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी सरकारने उठवावी या मागणीसाठी राज्यभर आत्तापर्यंत अनेक आंदोलनं देखील झाले आहेत. मात्र, अद्यापही बैलगाडा शर्यत सुरु करण्यात आली नाही. या संदर्भात खासदारांनी संसदेत मागणी केली. आमदारांनी आंदोलन केलं. मात्र, ही बंदी उठवण्यात आली नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी तर संसदेच्या मागील अधिवेशनात तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री गिरीराजसिंह यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. त्यांच्या मध्ये बैलाचा समावेश संरक्षित यादीतून वगळल्यास काही तरी सकारात्मक घडेल.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी. या मागणीसाठी राजकारण पुन्हा तापलं आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी बैल कामाला येतो. पण या बैलामुळे आता नवीन आर्थिक गणितं तयार होऊ लागली आहेत. बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी बैलगाडा शर्यत सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, ही बंदी उठवणं योग्य आहे का? या बंदी मागील कारण कोणती? बंदी उठवली जावी तर का उठवली जावी? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रच्या टू द पॉइंट कार्यक्रमात विशेष चर्चा झाली.

या चर्चा सत्रात मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील, आणि प्राणी मित्र संघटनेचे कार्यकर्ते मनोज ओसवाल यांच्याशी सर्व प्रश्नासंदर्भात थेट रोखठोक सवाल करत बैल शर्यतीबाबत माहिती जाणून घेतली.... पाहा काय आहे सर्वांची मत....

Updated : 16 Aug 2021 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top