Home > News Update > मी एलियन आहे, पत्रकाराने दिलं चॅट ला उत्तर

मी एलियन आहे, पत्रकाराने दिलं चॅट ला उत्तर

मी एलियन आहे, पत्रकाराने दिलं चॅट ला उत्तर
X

गेल्या काही काळात ब्लॅकमेलिंगचे प्रकार फार वाढले आहेत. अनेक तरूणांना काही तरूणींकडून मेसेज येतात त्यानंतर तरूणाला गुंतवून त्याच्याकडून ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. असाच प्रकार एका नामवंत पत्रकारासोबत घडला त्यावर त्याने एलियन असल्याचं सांगितलं. नेमकं काय घडलं त्यांच्या सोबत चला पाहूयात.

पत्रकार जितेंद्र दिक्षीत हे प्रसिध्द वृत्तवाहिनी एबीपी न्युज मध्ये वेस्ट इंडीया एडिटर म्हणुन काम पाहतात. त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर त्यांना एका मुलीच्या अकाउंटवरून मेसेज येतात आणि मग तिला हे मजेशीर उत्तर दिलं आहे. आणि त्यांच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट्स त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

आत या संभाषणात या दोघांमध्ये काय बोलणं झालं पाहुयात.. समोरील व्यक्ती जितेंद्र दिक्षीत यांनी Hi, goog morning असा मेसेज करते. त्यावर जितेंद्र दिक्षी ही तिला हाय करतात. मग कालची रात्र कशी गेली असा प्रश्न या व्यक्तीकडून जितेंद्र दिक्षीत यांना विचारण्यात आला. त्यावर ते तिला Good असं उत्तर देतात. मग ती त्यांना आपण कुठून आहात असा प्रश्न विचारते. त्यावर दिक्षीत तिला मी एलियन असून चोर पकड ग्रहावरून आलो असल्याचं सांगतात. आणि हा ग्रह अँड्रोमेडा गॅलॅक्सीमध्ये आहे. पृथ्वीच्या वरील अधिकाऱ्यांनी मला आमचे आंतर गॅलॅक्टीक तंत्रज्ञाम वापरून इथले सायबर क्रिमिनल्स पकडण्यासाठी बोलावले आहे. असं उत्तर दिल्यानंतर समोरील व्यक्तीने पुढे काही मेसेजच टाकला नाही.

एकंदरीत काय अशा प्रकारांमध्ये आपण फसलो तर आपलंच पुढे फार मोठं नुकसान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सावध राहिले पाहिजे. शक्य असल्यास लागलीच पोलिसात तक्रार देखील केली पाहिजे.

Updated : 3 Oct 2022 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top