Home > News Update > "माझा नंगानाच सुरूच राहणार..." अश्या उर्फी जावेद का म्हणाल्या

"माझा नंगानाच सुरूच राहणार..." अश्या उर्फी जावेद का म्हणाल्या

माझा नंगानाच सुरूच राहणार... अश्या उर्फी जावेद का म्हणाल्या
X

काही दिवसापासुन मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या वेशभुषेमुळे चर्चेत आली होती. या वेशभुषेमुळे अंगप्रदर्शन होत असल्यामुळे या विरोधात भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुंबई पोलीस ( mumbai police) यांच्याकडे तक्रार केली होती. चित्रा वाघ म्हणाल्या की, असा नंगानाच महाराष्ट्रात होऊ देणार नाही. या वर उर्फी जावेद यांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मुंबई विमातळावर जाताना उर्फी जावेद हीने 'माझा नंगानाच सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सोशल मिडीया हा अभिनेत्री उर्फी जावेदचा हा व्हिडीओ वायरल होत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर अभिनेत्री उर्फी जावेद चर्चैचा विषय़ बनला आहे, या वादावर भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे .

गेल्या काही दिवसापासुन पठाण (Pathan)चित्रपटातील 'बेशर्म रंग' या गाण्यातील भगवा रंगातील बिकिनी वरुन वाद सुरु असताना वर अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed)हीने सोशल मिडीयावर तिचा एक व्हिडिओ वाय़रल केला असुन त्यात ती भगवा रंगातील ड्रेस घातला असुन बँकग्राउंडला बेशर्म रंग गाणे आहे, त्यामुळे पठाण चित्रपटातील वादानंतर अभिनेत्री उर्फी जावेदचा अजुन एक वाद ओढावुन घेणार का? हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 5 Jan 2023 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top