Home > News Update > फेसबुक फॉलोअर ची संख्या अचानक कमी का झाली?

फेसबुक फॉलोअर ची संख्या अचानक कमी का झाली?

फेसबुक फॉलोअर ची संख्या अचानक कमी का झाली?
X

समाज माध्यमावर सध्या एकच चर्चा सुरू आहे . तुमचे फॉलोवर कमी का झाले? फक्त सेलिब्रिटींचेच नाहीतर फेसबुकचा मालक सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गचेही फॉलोवर कमी झाले आहेत.

असं कशामुळे झालं?

फक्त तुमचे किंवा तुमच्या संपर्कातल्या लोकांचेच नव्हे तर मार्क झुकरबर्गचे फॉलोवर्सही कमी झाले आहे. त्याचेही आता फक्त ९,९९३ फॉलोवर्स शिल्लक राहिले आहेत. फेसबुकच्या एका बगमुळे रातोरात ही संख्या घटली आहे. हजारो फॉलोवर्स कमी झाले आहेत. फेक फॉलोवर्स काढून टाकल्याने, तसंच फेक अकाऊंट्स डिलीट केल्याने हे झालं असावं, अशीही चर्चा आहे. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की, मार्क झुकरबर्गचे सगळेच फॉलोवर्स फेक होते का?

फक्त भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही याचा फटका बसला आहे. अमेरिकेतल्या काही मोठ्या माध्यम संस्थांचे फेसबुक फॉलोवर्स अचानक कमी झाले आहेत. विशेष म्हणजे न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, द हिल अशा अनेक माध्यमांचे फेसबुक फॉलोवर्स कमी झाले आहे. एप्रिल आणि जून २०२२ या काळात फेसबुकला १.४ बिलीयन बोट म्हणजेच खोट्या किंवा रोबोटच्या साहाय्याने चालवल्या जाणाऱ्या अकाऊंटवर शंका आली होती.

फेसबुकने जारी केलेल्या निवेदनामध्ये, फेसबुकने गेल्या तीन महिन्यांत ही फेक अकाऊंट्स बंद केली.आम्हाला शक्य तितकी सगळी फेक अकाऊंट्स काढून टाकायची आहेत. यातली अनेक अकाऊंट्स खोट्या प्रचारासाठी चालवली जात आहे आणि त्यांना आर्थिक प्रोत्साहनही देण्यात आलं होते.

Updated : 12 Oct 2022 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top